दिवसाची शांत सुरुवात
मुलांचा गोंधळ, मस्ती, खेळणे, दंगा, गाड्यांचे आवाज, हॉर्न, टीव्ही चे आवाज हे सर्व सकाळच्या वेळी कमी असते किंवा जवळपास नसतेच. सकाळचे काही तास हे शांततेने भरलेले असतात. हा माझा अत्यंत आवडीचा वेळ आहे. या वेळात मी मानसिक शांती अनुभवतो, स्वतःला वेळ देऊ शकतो, मोकळ्या हवेत श्वास घेतो, मनाला हवे ते वाचतो, विचार करतो.