Get it on Google Play
Download on the App Store

म्लेंच्छांचे राज्य असेल

http://dingo.care2.com/pictures/causes/3160/3159727.large.jpg

अर्थात ही परिस्थिती गेल्या शेकडो वर्षांपासून आहे. श्रीमद् भागवत पुराणानुसार...... 'सिंधू तट, चंद्रभागेचा किनारी प्रदेश, कौन्तिपुरी आणि काश्मीरवर आधी शूद्रांचा संस्कार ब्राम्हतेजापासून वंचित नाममात्र द्विज आणि म्लेंच्छांचे राज्य असेल. सर्वच्या सर्व राजे आचार आणि विचारांनी म्लेन्छांसारखे असतील. ते सर्व एकाच वेळी भिन्न भिन्न प्रांतांवर राज्य करतील.' उल्लेखनीय आहे की इथे फक्त सिंधू तटाचा उल्लेख आहे.
प्राचीन काळी हिंदुकुश पर्वताच्या पलीकडे राहणाऱ्या आणि ज्याने घुसखोरी करून अफगाणिस्तानचा खूप मोठा भाग बळकावला होता त्याला "म्लेंच्छ" असे म्हणत. आजकाल लोक म्लेंच्छ चा चुकीचा अर्थ घेतात. या लोकांचा धर्म कोणताही असो, जातीने ते सर्व म्लेंच्छ आहेत. आता उधे पहा, काश्मीरच्या ब्राम्हणांसोबत जे झाले, 'ते दुष्ट लोक स्त्रिया, मुले आणि गायींना मारण्यासही कचरणार नाहीत. दुसऱ्याची स्त्री आणि धन बळकावून घेण्यास सदा उत्सुक असतील. त्यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही आणि घटायला देखील वेळ लागणार नाही. त्यांची शक्ती आणि आयुर्मान मर्यादित असेल. त्यांचा धर्म केवळ सत्ता हाच असेल.' आता पूर्ण देशाची अशीच परिस्थिती आहे.राजधर्म तर जवळ जवळ संपलेलाच आहे तर अशा स्थितीत, 'ते लुटालूट करून भ्रष्टाचार करून आपल्या प्रजेचे रक्त शोषून घेतील. जेव्हा असे शासन असेल तेव्हा देशाच्या प्रजेत देखील तसाच स्वभाव, आचरण, भाषण यांची वृद्धी होईल. राजे लोक तर त्यांचे शोषण करतीलच, आपसात देखील ते एकमेकांना त्रास देतील आणि अखेर सर्वच्या सर्व नष्ट होऊन जातील.' - भागवत पुराण.