Get it on Google Play
Download on the App Store

वैदिक धर्माचे पतन होईल

http://jaikalki.com/wp-content/uploads/2014/06/family-kaliyug-eng.jpg

कलियुगात धर्म, सत्यवदन, स्वच्छता, सहिष्णुता, दया, आयुर्मान, शारीरिक शक्ती आणि स्मृती सर्व दिवसेंदिवस घटत जाईल. लोक केवळ स्नान करून असे समजतील की ते अंतरातूनही स्वच्छ झाले आहेत.
धरतीवर राहणारा कोणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारे वैदिक आणि धार्मिक कार्यांमध्ये रुची घेणार नाही, तो एक स्वच्छंद जीवन व्यतीत करेल. कलियुगात लोक केवळ एक धागा परिधान करून स्वतःला ब्राम्हण म्हणवून घेतील.आपल्या तुच्छ बुद्धीलाच शाश्वत समजून काही मूर्ख ईश्वर आणि धर्मग्रंथ यांचे प्रमाण मागण्याचे दुःसाहस करतील. याचा अर्थ असा की त्यांचे पाप जोरावर आहे.जसजसे घोर कलियुग येत जाईल तसतसे सौराष्ट्र, अवन्ती, अधीर, शूर, अर्बुद आणि मालव देशातील ब्राम्हण संस्कारशून्य होत जातील आणि राजा लोकही शूद्रतुल्य होतील.इथे शूद्र शब्दाचा अर्थ आचरणाशी आहे जे वेदांच्या विरुद्ध असेल. मांस, मदिरा आणि संभोग इत्यादी प्रवृत्तींमध्ये रत राहणाऱ्या राक्षसधर्मीला शूद्र म्हटले गेले आहे. जे ब्रम्हाला मानतात तेच ब्राम्हण असतात. आजची जनता ब्रम्ह सोडून बाकी सर्वाना पुजते.