Android app on Google Play

 

मठ म्हणजे काय?

 

हे मठ गुरु शिष्य परंपरेच्या निर्वहनाचे प्रमुख केंद्र आहेत. पूर्ण भारतात सर्व संन्यासी वेगवेगळ्या मठांशी जोडलेले असतात. या मठांमध्ये शिष्यांना संन्यासाची दीक्षा दिली जाते. सन्यास घेतल्यानंतर नावानंतर दीक्षित म्हणून विशेषण लावण्यात येते ज्यावरून असा संकेत मिळतो की हा संन्यासी कोणत्या मठाचा आहे आणि वेदाच्या कोणत्या परंपरेचा वाहक आहे. सर्व मठ वेगवेगळ्या वेदांचे प्रचारक असतात आणि त्यांचे एक विशेष महावाक्य असते. मठांना 'पीठ' असे देखील म्हटले जाते. आदी शंकराचार्यांनी या चारही मठांमध्ये आपल्या योग्यतम (सर्वांत योग्य) शिष्यांना मठाधिपती बनवले होते. ही परंपरा आजही या मठांमध्ये प्रचलित आहे. प्रत्येक मठाधिपतीना शंकराचार्य म्हटले जाते आणि ते आपल्या जीवन काळातच आपल्या सर्वांत योग्य शिष्याला उत्तराधिकारी बनवतात.

आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेले चार मठ :

1. श्रृंगेरी मठ

2. गोवर्धन मठ

3. शारदा मठ

4. ज्योतिर्मठ


या ४ मठांव्यतिरिक्त तामिळनाडू मधील कांची मठ देखील शंकराचार्यांनी स्थापन केला आहे असे मानले जाते