Android app on Google Play

 

भूमिका

 

http://4.bp.blogspot.com/-ycd3oljvyPs/Vp9DxXCbDfI/AAAAAAAAB3M/L0Kt_K1iCwI/s1600/Untitled-13.jpg

प्राचीन भारतीय सनातन परंपरेचा विकास आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार यांच्यात आदी शंकराचार्य यांचे महान योगदान आहे. त्यांनी भारतीय सनातन परंपरेचा संपूर्ण देशात प्रसार करण्यासाठी भारताच्या चारही कोपऱ्यात शंकराचार्य मठांची (पूर्वेला गोवर्धन, जगन्नाथपुरी, पश्चिमेला शारदामठ, गुजरात, उत्तरेला ज्योतिर्मठ, बद्रीधाम आणि दक्षिणेला शृंगेरी मठ, रामेश्वर) स्थापना केली होती. इ. स. पू. आठव्या शतकात स्थापन केलेले हे मठ आजही चार शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. आदी शंकराचार्यांनी या ४ मठांच्या व्यतिरिक्त पूर्ण देशात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली होती.
आदी शंकराचार्यांना अद्वैत परंपरेचे प्रवर्तक मानले जाते.