Get it on Google Play
Download on the App Store

पंधरावा दिवस

द्रोणांची शक्ती वाढत चालल्याने पांडवांच्या पक्षात दहशत पसरली होती. पिता पुत्रांनी मिळून महाभारत युद्धात पांडवांचा पराभव जवळ जवळ निश्चित केला होता. पांडवांचा जवळ येणारा पराभव पाहून कृष्णाने युधिष्ठिराला कपटाचा सहारा घ्यायला सांगितले. या योजनेअंतर्गत युद्धात ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला. पण युधिष्ठीर खोटे बोलण्यास तयार नव्हता. तेव्हा अवन्तिराज याच्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा भीमाने वध केला. यानंतर ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला.
गुरु द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला या गोष्टीची सत्यता विचारली कारण त्यांना माहित होते की धर्मराजा कधीही खोटे बोलणार नाही. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले, की "होय, अश्वत्थामा मारला गेला, परंतु हत्ती."
जेव्हा युधिष्ठिराच्या तोंडून "हत्ती" शब्द निघाला, त्याच वेळी श्रीकृष्णाने जोराने शंखनाद केला, ज्याच्या आवाजात द्रोणाचार्यांना युधिष्ठिराचा शेवटचा शब्द ऐकू आला नाही आणि आपला प्रिय पुत्र अश्वत्थामा याच्या मृत्यूची बातमी ऐकून ते हताश झाले आणि त्यांनी आपले शस्त्र त्यागले आणि युद्धभूमीवर डोळे बंद करून अत्यंत दुःखी अवस्थेत जमिनीवर बसले. हीच संधी साधून द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने निःशस्त्र असलेल्या द्रोणांचे तलवारीने मस्तक उडविले.
कौरव पक्षाचे नुकसान : द्रोण
कोण मजबूत राहिले : पांडव