Get it on Google Play
Download on the App Store

नियम

पितामह भीष्मांच्या सल्ल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र होऊन युद्धाचे काही नियम बनवले.
१. प्रत्येक दिवशी युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. सूर्यास्तानंतर युद्ध होणार नाही.
२. युद्ध समाप्त झाल्यानंतर छल - कपट विसरून सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतील.
३. रथवाला रथवाल्याशी, हत्तीवाला हत्तीवाल्याशी आणि पायदळ पायदळाशीच युद्ध करेल.
४. एका वीरासोबत एकच वीर युद्ध करेल.
५. भीतीने पळून जाणाऱ्या किंवा शरण आलेल्या लोकांवर अस्त्र-शस्त्राचा प्रहर केला जाणार नाही.
६. जो वीर निःशस्त्र होईल त्याच्यावर कोणतेही शस्त्र उचलले जाणार नाही.
७. युद्धामध्ये सेवकांचे काम करणाऱ्यांवर कोणीही शस्त्र चालवणार नाही.