Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

असे मानले जाते की महाभारताचा युद्धात एकमेव जीवात राहिलेला कौरव युयुत्सु होता आणि २४,१६५ कौरव सैनिक बेपत्ता झाले होते. लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले जे महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते.
संशोधनानुसार जेव्हा महाभारताचे युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णाचे वय ८३ वर्षांचे होते. महाभारताच्या युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांनी देहत्याग केला होता. याचा अर्थ ११९ वर्षांच्या वयात त्यांनी देहत्याग केला होता. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. ज्योतिषीय माहितीनुसार कलियुगाचा आरंभ शक संवत च्या पूर्वी ३१७६ वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला होता. आत्ता शके १९३६ आहे. यावरून कालीयुदाची सुरुवात होऊन ५११२ वर्ष झाली.
कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, जे १८ दिवस चालले होते. चला पाहूयात महाभारताच्या युद्धाच्या या १८ दिवसांच्या रोचक घटनाक्रम...