Get it on Google Play
Download on the App Store

अकरावा दिवस

भीष्म शरशय्येवर पडल्यावर अकराव्या दिवशी कर्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांना सेनापती बनवले गेले. अकराव्या दिवशी सुशर्मा आणि अर्जुन, शल्य आणि भीम, सात्यकी आणि कर्ण व सहदेव आणि शकुनी यांच्यात युद्ध झाले. कर्णाने देखील या दिवशी पांडव सेनेचा भयंकर संहार केला. दुर्योधन आणि शकुनीने द्रोणांना सांगितले की त्यांनी युधिष्ठिराला बंदी बनवावे म्हणजे युद्ध आपल्या आपण समाप्त होईल, तव्हा दिवसअखेर जेव्हा द्रोणांनी युधिष्ठिराला युद्धात हरवून ते त्याला बंदी बनवण्यासाठी पुढे झाले तेवढ्यात अर्जुनाने येउन आपल्या  बाणांच्या वर्षावाने त्यांना रोखले. नकुल युधिष्ठिराच्या सोबत होता आणि आता अर्जुनही युधिष्ठिराचा सोबत आला. अशा प्रकारे कौरव युधिष्ठिराला पकडू शकले नाहीत.
कोण मजबूत राहिले : कौरव.