Get it on Google Play
Download on the App Store

तीन भागांत (चरण) लिहिले महाभारत

वेदव्यास यांच्या महाभारताला नक्कीच मौलिक मानण्यात येते. परंतु ते तीन भागांत लिहिण्यात आले. पहिल्या चरणात ८,८०० श्लोक, दुसऱ्यात २४ हजार आणि तिसऱ्या चरणात १ लाख श्लोक लिहिण्यात आले. वेदव्यासांच्या महाभारता व्यतिरिक्त भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट्यूट, पुणे यांचे संस्कृत महाभारत सर्वांत प्रामाणिक मानण्यात येते.

krishna_arjun

इंग्रजीमध्ये संपूर्ण महाभारत २ वेळा अनुवादित करण्यात आले. पहिला अनुवाद १८८३-१८९६ च्या मध्ये किसारी मोहन गांगुली यांनी केले होते. आणि दुसरे मनमंथनाथ दत्त यांनी १८९५ पासून १९०५ च्या मध्ये.