Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

http://4.bp.blogspot.com/-B2ZD7Vno-kg/ViPw2hZxjyI/AAAAAAAAAjA/jS3XrqMuCv4/s1600/Interfaith-vedas.jpg

महाभारताला पंचम वेद म्हटले गेले आहे. हा ग्रंथ आपल्या देशाच्या तनामनात व्यापून राहिलेला आहे. ही भारताची राष्ट्रीय गाथा आहे. या ग्रंथामध्ये तत्कालीन भारताचा (आर्यावर्त) समग्र इतिहास वर्णीत आहे. आपल्या आदर्श स्त्री पुरुषांच्या चरित्राने हा ग्रंथ देशाचे जनजीवन प्रभावित करतो. यामध्ये शेकडो पात्र, स्थान, घटना तसेच विचित्र गोष्टी आणि विडंबनांचे वर्णन आहे. प्रत्येक हिंदुच्या घरात महाभारत असले पाहिजे.

महाभारतात कित्येक घटना, संबंध आणि ज्ञान विज्ञानाची रहस्य लपलेली आहेत. महाभारतातील प्रत्येक पात्र जिवंत आहे. मग ते कौरव, पांडव, कर्ण आणि कृष्ण असोत किंवा धृष्टद्युम्न, शल्य, शिखंडी आणि कृपाचार्य असोत. महाभारत केवळ योद्ध्यांच्या गाथेपर्यंत सीमित नाहीये. महाभारताशी निगडीत शाप, वचन आणि आशीर्वादात देखील रहस्य लपलेली आहेत.

खरे म्हणजे महाभारताची कहाणी युद्धानंतर समाप्त होत नाही. महाभारताची खरी कहाणी तर युद्धानंतरच सुरु होते. आजपर्यंत अश्वत्थामा जिवंत का आहे? यदुवंशाला नाशाचा शाप का देण्यात आला आणि धर्म का चालू लागला होता कलियुगाच्या मार्गावर? महाभारताचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. महाभारत युद्ध आणि त्याच्याशी निगडीत १० रहस्यांचा आम्ही शोध लावला आहे जी तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी आहे...