Get it on Google Play
Download on the App Store

१८ चे रहस्य

http://2.bp.blogspot.com/-KSsv3N-FaL8/VVhFUv_OhOI/AAAAAAAAATA/H_1qkpaJvH4/s1600/A-5.jpg

असे म्हणतात की महाभारताच्या युद्धात १८ आकड्याचे महत्व खूप आहे. महाभारताच्या ग्रंथात १८ अध्याय आहेत. कृष्णाने एकूण १८ दिवस अर्जुनाला ज्ञान दिले. १८ दिवसच युद्ध चालले. गीतेमध्ये देखील १८ अध्याय आहेत. कौरव आणि पांडवांची एकूण सेना देखील १८ अक्षौहिणी होती ज्यामध्ये कौरवांची ११ तर पांडवांची ७ अक्षौहिणी सेना होती. या युद्धाचे प्रमुख सूत्रधार देखील १८ होते. या युद्धात केवळ १८ योद्धे जिवंत राहिले. प्रश्न असा उपस्थित होती को हे सर्व १८ या संख्येतच का घडत गेले? हा निव्वळ योगायोग आहे की याच्यात काही रहस्य लपलेले आहे?