Android app on Google Play

 

राजनैतिक जीवन

 

एक गोष्ट स्पष्ट आहे की हडप्पाची विकसित नगर व्यवस्था, विशाल सार्वजनिक स्नानगृहांचे अस्तित्व, आणि परदेशांशी व्यापारी संबंध या गोष्टी एखादी मोठी राजनैतिक सत्ता असल्याशिवाय शक्य झाली नसती. परंतु या गोष्टीचे कोणतेही सबळ पुरावे मिळालेले नाहीत की इथेले शासक कसे होते आणि शासन प्रणालीचे स्वरूप काय होते. परंतू इथली नगर व्यवस्था पाहता असे वाटते की एखादी नगर पालिके सारखी स्थानिक प्रशासन संस्था असावी.