Android app on Google Play

 

हडप्पा संस्कृतीची स्थळे

 

या संस्कृतीचे क्षेत्र विश्वातील सर्व प्राचीन संस्कृतींच्या क्षेत्रापेक्षा कित्येक पटींनी मोठे आणि विशाल होते. या परिपक्व संस्कृतीचे केंद्रस्थान पंजाब आणि सिंध प्रांतात होते. त्यानंतर तिचा विस्तार दक्षिण आणि पूर्व दिशांना झाला. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीच्या अंतर्गत पंजाब, सिंध, बलुचिस्तान यांचे भागच नव्हे, तर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेशचे सीमांत भाग देखील होते. तिचा विस्तार उत्तरेला रहमानढेरी पासून दक्षिणेला दैमाबाद (महाराष्ट्र) पर्यंत आणि पश्चिमेला बलुचिस्तानच्या मकरान समुद्र तटाच्या सुत्कागेनडोर पासून ईशान्येला मेरठ आणि कुरुक्षेत्र पर्यंत होता. प्रारंभिक विस्तार जो प्राप्त होता त्यामध्ये संपूर्ण क्षेत्र त्रीकोणाकार होते (उत्तरेला जम्मू च्या माण्डा पासून दक्षिणेला गुजरातच्या भोगत्रार पर्यंत आणि पश्चिमेला अफगाणिस्तानच्या सुत्कागेनडोर पासून पूर्वेला उत्तर प्रदेशच्या मेरठ पर्यंत होते आणि तिचे क्षेत्रफळ 12,99,600 वर्ग किलोमीटर होते). अशा प्रकारे हे क्षेत्र आधुनिक पाकिस्तानपेक्षा मोठे आहेच, प्राचीन मिस्र आणि मेसोपोटामियापेक्षा देखील मोठे आहे. इसवीसन पूर्व तिसऱ्या आणि दुसऱ्या सहस्त्रकात विश्वभरात कोणत्याही संस्कृतीचे क्षेत्र हडप्पा संस्कृतीपेक्षा मोठे नव्हते. आतापर्यंत भारतीय उपखंडात या संस्कृतीच्या एकूण १००० स्थळांचा शोध लागला आहे. त्यांच्यापैकी काही प्राथमिक अवस्थेतील आहेत तर काही विकसित अवस्थेतील तर काही उत्तरवर्ती अवस्थेतील. परिपक्व अवस्थेतील स्थाने कमीच आहेत. त्यांच्यापैकी अर्धा डझन स्थानांनाच नगर म्हटले जाऊ शकते. यांच्यापैकी दोन नगरे अतिशय महत्वपूर्ण आहेत. पंजाबचे हडप्पा आणि सिंध चे मोहेंजोदडो (शाब्दिक अर्थ - प्रेतांचा टिळा). दोन्ही स्थाने वर्तमान पाकिस्तानात आहेत. दोन्ही एकमेकांपासून ४८३ किमी दूर होती आणि सिंधू नदीद्वारे जोडलेली होती. तिसरे नगर मोहेंजोदडो पासून १३० किमी दक्षिणेला चन्हुदडो स्थळावर तर चौथे नगर गुजरातच्या खंभात खाडीच्या वर लोथल नामक स्थळावर. याव्यतिरिक्त राजस्थानच्या उत्तर भागात कालीबंगा (शाब्दिक अर्थ - काळ्या रंगाच्या बांगड्या) आणि हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बनावली. या सर्व ठिकाणी परिपक्व आणि विकसित हडप्पा संस्कृतीचे दर्शन होते. सुतकागेंडोर तथा सुरकोतडाच्या समुद्र किनाऱ्यावरील नगरांमध्ये देखील या संस्कृतीची परिपक्व अवस्था दिसून येते. या दोहोंचे वैशिष्ट्य म्हणजे एक एक नगर दुर्गाचे असणे. उत्तर हडप्पा अवस्था गुजरातच्या काठीयावाड द्वीपकल्पात रंगपूर आणि रोजडी या ठिकाणी देखील आढळली आहे. या संस्कृतीची माहिती सर्वप्रथम १८२६ मध्ये चार्ल्स मेन यांना मिळाली.