Get it on Google Play
Download on the App Store

परिचय

विश्वातील प्राचीन नदीच्या खोऱ्यातील संस्कृतींपैकी सिंधू संस्कृती एक प्रमुख संस्कृती होती. तिला हडप्पा संस्कृती आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या नावानेही ओळखण्यात येते. तिचा विकास सिंधू आणि घघ्घर / हकडा (प्राचीन सरस्वती) च्या किनारी झाला. मोहेंजोदडो, कालीबंगा, लोथल, धोलावीरा, राखीगढी आणि हडप्पा तिची प्रमुख केंद्र होती. डिसेंबर २०१४ मध्ये भिर्दाना हे आतापर्यंत शोधण्यात आलेले सिंधू संस्कृतीतील सर्वांत प्राचीन शहर मानण्यात आले आहे. ब्रिटीश काळात झालेल्या खोदकामाच्या आधारावर पुरातत्व आणि इतिहासकारांचे अनुमान आहे की ही अत्यंत विकसित संस्कृती होती आणि ही शहरे अनेक वेळा वसली आणि उजाड झाली आहेत.
चार्ल्स मेसेन याने पहिल्यांदा या पुरातन संस्कृतीचा शोध लावला. कनिंघम याने १८७२ मध्ये या संस्कृतीच्या बाबतीत सर्वेक्षण केले. फ्लीटने या पुरातन संस्कृतीच्या विषयी एक लेख घेतला. १९२१ मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पाचे उत्खनन केले. अशा प्रकारे या संस्कृतीचे नाव हडप्पा ठेवण्यात आले. पहिल्यांदा नगरांचा उदय झाल्यामुळे तिला प्रथम नागरीकरण देखील म्हटले जाते आणि पहिल्या वेळी कांस्यचा प्रयोग म्हणून तिला कांस्य संस्कृती देखिल म्हटले जाते. सिंधू संस्कृतीच्या १४०० केंद्रांचा आतापर्यंत शोध लागला आहे ज्यापैकी ९२५ केंद्र भारतात आहेत. ८०% स्थळे सरस्वती नदी आणि तिच्या उपनद्यांच्या आसपास आहेत. आतापर्यंत शोध लागलेल्या स्थळांपैकी एकूण ३% ठिकाणीच उत्खनन होऊ शकले आहे.