Android app on Google Play

 

नामोत्पत्ति

 

सिंधू संस्कृतीचे क्षेत्र अत्यंत व्यापक होते. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील उत्खननाने या संस्कृतीचे प्रमाण मिळाले आहे. अर्थात विद्वानांनी तिला सिंधू संस्कृतीचे नाव दिले, कारण हे क्षेत्र सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या क्षेत्रात येते, परंतु नंतर रोपड, लोथल, कालीबंगा, वनमाली, रंगापुर इत्यादी क्षेत्रात देखिल या संस्कृतीचे अवशेष मिळाले जे सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे अनेक इतिहासकार या संस्कृतीचे प्रमुख केंद्र हडप्पा असल्या कारणाने या संस्कृतीला "हडप्पा संस्कृती" नाव देणेच अधिक उचित मानतात. भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक सर जॉन मार्शल यांनी १९२४ मध्ये सिंधू संस्कृतीच्या विषयावर तीन महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले.