Android app on Google Play

 

त्रिविष्टपेश्वर महादेव

 

श्री त्रिविष्टपेश्वर महादेवाची स्थापना स्वतः देवतांनी केली आहे जी महाकाल वनाचे सौंदर्य आणि महती दर्शवते. पौराणिक कथांनुसार एकदा देवर्षी नारद इंद्राचे दर्शन घेण्यासाठी स्वर्ग लोकात आले. तिथे देवराज इंद्र याने देवर्षी नारदांना महाकाल वनाचे महात्म्य विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले की महाकाल वन हे सर्व तीर्थ क्षेत्रांत उत्तम क्षेत्र आहे. साक्षात महेश्वर तिथे आपल्या गणांसह वास्तव्य करून आहेत. तिथे साथ करोड हजार तथा साथ करोडशत निवास करतात जे भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारे आहेत. सोबतच तिथे नऊ कोटी शक्ती निवास करतात.
हे ऐकून इंद्रादी देवता महाकाल वनात गेले. तिथे गेल्यावर त्यांना आढळून आले की महाकाल वन हे ब्राम्हलोक आणि विष्णुलोक यांच्यापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. तेव्हा आकाशवाणी झाली की तुम्ही सर्व देव मिळून कर्कोटक च्या पूर्वेला आणि महामाया च्या दक्षिणेला एका दिव्य लिओन्गचि स्थापना करा. हे ऐकून देवता आणि इंद्रदेवाने आपल्या नावाने त्रिविष्टपेश्वर महादेवाची स्थावाना केली आणि भक्तिभावाने पूजन केले.
त्रिविष्टपेश्वर महादेवाचे मंदिर महाकाल मंदिर परिसरात ओंकारेश्वर मंदिराच्या मागे उभे आहे. बाराही महिने इथे भाविक आणि श्रद्धाळू येईन दर्शनाचा लाभ घेताना दिसतात, परंतु संक्रांत, अष्टमी आणि चतुर्दशी या सिवशी इथे दर्शनाचे विशेष महत्त्व आहे.