Android app on Google Play

 

श्री मनकामनेश्वर महादेव

 


गन्धर्ववती घाटात असलेल्या श्री मनकामनेश्वर महादेवाच्या केवळ दर्शनाने सौभाग्य प्राप्त होते. असे म्हटले जाते की एकदा ब्रम्हदेव प्रजेच्या इच्छेने ध्यान करत होते. त्याच वेळी एक सुंदर पुत्र उत्पन्न झाला. ब्रम्हाने विचारल्यावर तो म्हणाला की आपल्याच इच्छेने आणि आपल्याच अंशाने उत्पन्न झालो आहे. मला आज्ञा द्या की मी काय करू? ब्रम्हाने सांगितले की तू सृष्टीची रचना कर. हे ऐकून कंदर्प नावाचा तो पुत्र तिथून निघून गेला परंतु लपून बसला.


हे पाहून ब्रम्हा खूप क्रोधीत झाले आणि नेत्राग्नी ने नाशाचा शाप दिला. कंदर्प ने क्षमा मागितली. तेव्हा ब्रम्हा म्हणाले की मी तुला जिवंत राहण्यासाठी १२ स्थाने देतो, जी स्त्री शरीरावर असतील. एवढे बोलून ब्रम्हदेवाने त्याला पुष्पाचे धनुष्य आणि पाच नाव देऊन निरोप दिला. कंदर्प ने या शस्त्रांचा उपयोग करून सर्वाना वश केले. जेव्हा ध्यानमग्न असलेल्या भगवान शंकराला वश करण्याचा प्रयत्न त्याने केला, तेव्हा क्रोधीत होऊन शंकराने तिसरा डोळा उघडला, आणि कंदर्प (कामदेव) भस्म होऊन गेला. त्याची पत्नी राती विलाप करू लागली तेव्हा आकाशवाणी झाली की तू विलाप करू नकोस, तुझा पती विना शरीराचा (अनंग) राहील.
जर त्याने महाकाल वनात जाऊन पूजा केली तर तुझे मनोरथ पूर्ण होईल. कामदेवाने (अनंग) महाकाल वनात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यावर प्रसन्न होऊन महादेवाने वरदान दिले की इथून पुढे माझे नाव, तुझ्या नावावरून कंदर्पेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध होईल. चैत्र शुक्ल त्रयोदशी या दिवशी जो कोणी मनुष्य इथे दर्शन घेईल तो देवलोकात जाईल.