Android app on Google Play

 

श्री स्वर्गद्वारेश्वर महादेव

 

श्री स्वर्गद्वारेश्वर महादेवाची महिमा गण आणि देवता यांच्यातील संघर्ष आणि देवतांची स्वर्ग प्राप्ती यांच्याशी निगडीत आहे. पौराणिक कथांनुसार श्री स्वर्गद्वारेश्वर महादेवाच्या पूजनाने इंद्रा समवेत सर्व देवतांना स्वर्गाची प्राप्ती झाली होती. पौराणिक कथांनुसार एकदा माता सतीचे पिताश्री राजा दक्ष प्रजापती याने भव्य यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवी देवता आणि गण यांना आमंत्रित केले परंतु आपली कन्या सती आणि तिचे पती श्री महादेव यांना आमंत्रण दिले नाही. तरी देखील माता सती त्या याज्ञासाठी उपस्थित राहिली. परंतु तिने तिथे पहिले की तिचे पिता भगवान महादेवाचा अपमान करत होते. हे पाहीन ती अत्यंत क्रोधीत झाली आणि परिणामतः तिने अग्निकुंडात उडी घेऊन प्राणांचा त्याग केला. जेव्हा भगवान शानाकारे माता सतीला पृथ्वीवर मूर्च्छित अवस्थेत पहिले तेव्हा ते अत्यंत क्रोधीत झाले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश करण्यासाठी आपले गण तिथे पाठवले.
अस्त्र शस्त्र यांनी सुसज्ज असलेल्या त्या गणांचा तिथे देवतांशी भीषण संघर्ष झाला. वीरभद्र या गणाने इंद्रदेवाला आपल्या त्रिशुळाने मूर्च्छित केले. त्यानंतर गणांच्या समोर देवतांची शक्ती क्षीण होऊ लागली. गणांकडून पराभूत होऊन सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना मदत करण्यासाठी विनंती केली. देवतांची अशी अवस्था पाहून भगवान विष्णू क्रोधीत झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने गणांवर प्रहार केला. सुदर्शन चक्र तीव्रतेने गणांचा नाश करू लागले. मग भगवान विष्णू पुढे झाले आणि वीरभद्रावर गदेने प्रहार केला परंतु शंकराच्या वरदानामुळे वीरभद्र मारला गेला नाही.


विष्णू भगवानांच्या हल्ल्याने गण पळू लागले आणि भगवान शंकरांकडे पोचले. त्यांच्या पाठोपाठ सुदर्शन आणि भगवान विष्णू देखील तिथे पोचले. तिथे भगवान शंकरांना त्रिशूल घेऊन असलेले पाहताच भगवान विष्णू सुदर्शना सहित अंतर्धान पावले. अशा प्रकारे यज्ञ उद्ध्वस्त झाला आणि शंकराने आपल्या गणांना स्वर्गाच्या द्वारावर बसवून ठेवले आणि आज्ञा दिली की एकही देवाला स्वर्गात प्रवेश द्यायचा नाही. तेव्हा सर्व देवता एकत्र होऊन ब्रम्हदेवाकडे गेले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली.
देवतांनी ब्रम्हदेवाला सांगितले की कृपा करून आम्हाला असा उपाय सांगा जेणेकरून आम्हाला पुन्हा स्वर्गाची पप्राप्ती होऊ शकेल. सर्व ऐकून ब्रम्हदेव म्हणाले की तुम्ही सर्व शंकराला शरण जा आणि त्यांचीच आराधना करून त्यांना प्रसन्न करा. तुम्ही सर्व महाकाल वनात जा, तिथे उपस्थित कपालेश्वर महादेवाच्या पूर्वेला एक दिव्य लिंग आहे, त्याची आराधना करा. तेव्हा इंद्रादी देवता महाकाल वनात गेले आणि इथे येऊन ब्राम्हदेवांनी सांगितलेल्या दिव्य लिंगाचे दर्शन घेतले आणि आराधना केली.त्या लिंगाच्या दर्शनाने प्रसन्न होऊन शंकराने स्वर्गाच्या द्वारावरून आपल्या गणांना बाजूला केले आणि देवताना स्वर्गाची प्राप्ती झाली. म्हणूनच या दिव्य लिंगाचे नाव स्वर्गद्वारेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध झाले.
मान्यता आहे की श्री स्वर्गद्वारेश्वर महादेवाच्या दर्शनाने संपूर्ण पापांचा नाश होतो आणि स्वर्गाची प्राप्ती होते. असे देखील मानले जाते की स्वर्गद्वारेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने समस्त चिंता आणि भीती यांचा नाश होतो. प्रत्येक अष्टमी, चतुर्दशी आणि सोमवारी इथे दर्शनाचे विशेष महत्त्व आहे. श्री स्वर्गद्वारेश्वर महादेवाचे मंदिर उज्जैन मध्ये खंडार मोहल्ल्याच्या मागे नलीयाबाखल जवळ उभे आहे.