शिखंडीला पौरुषत्व कसे प्राप्त झाले -
शिखंडी ज्या जंगलात पाळली, त्या वनाचे रक्षण स्थूणाकर्ण नावाचा एक यक्ष करत होता. यक्षाने जेव्हा शिखंडीला पहिले तेव्हा त्याने तिला तिथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा शिखंडीने त्याला सर्व खरे खरे सांगितले. सर्व वृत्तांत व्यवस्थित लक्षात आल्यानंतर शिखंडीची मदत करण्यासाठी यक्षाने आपले पौरुषत्व तिला बहाल केले आणि तिचे स्त्रीत्व स्वतः धारण केले. यक्षाने शिखंडीला सांगितले की तुझे कार्य सिद्ध झाल्यानंतर तू माझे पौरुषत्व मला परत कर. शिखंडीने होकार दिला आणि आपल्या नगरात परत आला. शिखंडीला पुरुष रुपात बघून राजा द्रुपद खूप आनंदित झाला. राजा हिरण्यवर्माने देखील शिखंडीच्या पुरुष रुपाची परीक्षा घेतली आणि शिखंडी पुरुष आहे हे समजल्यावर तो अतिशय आनंदित झाला.