Android app on Google Play

 

कोणत्या रुपात जन्म घेतला अंबाने?

 भीष्म पितामहांनी दुर्योधनाला सांगितले की तीच अंबा या जन्मात शिखंडी च्या रूपाने जन्माला आली आहे. राजा द्रुपदाला कोणतेही संतान नव्हते, तेव्हा त्याने महादेवाला प्रसन्न करून पुत्र होण्याचे वरदान मागितले. महादेवांनी त्याला सांगितले की तुझ्याकडे एका कन्येचा जन्म हिईल, जी पुढे जाऊन पुरुष बनेल. कालांतराने द्रुपदाच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला.
भगवान शंकराच्या वरदानाचे स्मरण ठेवत राजा द्रुपदाने सर्वाना असेच सांगितले की त्याच्याकडे पुत्र जन्माला आला आहे. ती तरुण झाल्यावर राणीने राजाला म्हटले की भगवान शंकराचे वरदान कधीही विफल जाणार नाही. त्यामुळे आपण आता एखाद्या कन्येशी तिचा विवाह करून दिला पाहिजे. राणीचे बोलणे ऐकून राजा द्रुपदाने दशार्णराज हिरण्यवर्मा याच्या कन्येशी शिखंडीचा विवाह करून दिला.