Get it on Google Play
Download on the App Store

विष्णु शर्मा



विष्णू शर्मा भारतातील एक विद्वान आणि लेखक होते. अतिप्रसिद्ध असलेल्या पंचतंत्राच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. पंचतंत्र कथांचा काळ निश्चित ओळखणे कठीण आहे, परंतु असा अंदाज आहे की इ.स.पू. १२०० आणि इ.स.पू. ३०० यांच्या दरम्यान या कथा लिहिलेल्या असाव्यात. पंचतंत्र ही एक कथामाला आहे. ती संस्कृत आणि पली भाषेत लिहिण्यात आली. युगे लोटली आणि भाषेमध्ये लक्षणीय बदल घडून आले तरी देखील पंचतंत्र कथा आजही सर्वांत लोकप्रिय कथामाला आहे.
या कथामालेतील कथा भारतीय उपखंडातील भाषा आणि जीवन शैली यांचे दर्शन घडवतात आणि त्यासोबतच हिंदू धोरणांचे प्राथमिक धडे देखील देतात.