Android app on Google Play

 

कृष्णभगवत गीतेच्या लेखकापेक्षा महान शिक्षक कोण असू शकेल? आयुष्य कसे जगावे हे शिकवणाऱ्या भागवत गीतेचे महत्त्व इतका प्रचंड काळ लोटल्यानंतर देखील जराही कमी झालेले नाही.
कर्मण्येवाधिकारस्ते ,मां फलेषु कदाचन
मां कर्म फल हेतुर भुर, मां ते संगोस्तवकर्मणि
तुझं काम कर्म करणे हे आहे, फळाची इच्छा धरणे नाही. म्हणूनच त्या फळाला कधीच आपले उद्दिष्ट बनू देऊ नये आणि अपयशाला कधीही आपले हत्यार बनवू नये.
भगवत गीता ही जीवन, मृत्यू आणि कर्म यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ मानण्यात आली आहे. लोकांनी अक्षरशः आपली आयुष्य वेचली गीतेचा अर्थ समजून घेण्यासाठी, परंतु प्रत्यक्षात गीता आणि कृष्ण यांचा विश्वावर असलेला प्रभाव समजून घेणे जवळ जवळ अशक्य आहे.