स्वामी विवेकानंद
एक शूर भिक्षुक ज्याने अमेरिकेमध्ये अशा काळात हिंदू आणि भारतीय संस्कृतीची ध्वजा फडकावली जेव्हा पाश्चिमात्य संस्कृती भारतीयांना रानटी समजत होते. विवेकानंद हे आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचे सर्वांत लाडके विद्यार्थी होते. ते शब्दशः त्यागमूर्ती होते. त्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहून घेतले होते. देशातील गरीब, मागासवर्गीय यांच्या विकासासाठी ते आयुष्यभर झटले.