Android app on Google Play

 

विलायनुर एस रामचंद्रन

 जेव्हा मेंदूचे डॉक्टर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूचे विश्लेषण करत होते, तेव्हा रामचंद्रन यांनी वेगळा मार्ग अवलंबिला. त्यांनी अशा रुग्णांचा अभ्यास केला ज्यांच्या मेंदूमध्ये काहीतरी विचित्र किंवा अजब प्रकारचा त्रास आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, एक अशी व्यक्ती जिचा शरीराचा एखादा अवयव गेलेला असतानाही त्या व्यक्तीला त्या अवयवाची जाणीव होते. याला फैंटम लिम्बस असे म्हणतात, आणि याचा शोध रामचंद्र यांनीच लावला. आणखी एक उदाहरण म्हणजे एक असा माणूस, जो आपल्या पत्नीला एकदम संपूर्णपणे विसरून गेला. रोज तो तिच्याशी एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे वागत असे. अशा प्रकरणांतून त्यांना मानवी मेंदू बद्दल आणखी काही तथ्य माहिती पडली.