Android app on Google Play

 

श्रीमान आनंद कुमार

 

हे गरीब विद्यार्थ्यांना विनामोबदला शिकवतात आणि त्यांना आय.आय.टी. सारख्या ठिकाणी प्रवेश मिळवून देतात. दरवर्षी २ लाखाच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि त्यातील केवळ ५००० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. गतवर्षी यातील ३० विद्यार्थी पटना इथल्या एका कोचिंग सेंटर मधून आले होते. हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील होते आणि आनंदकुमार या ३० विद्यार्थ्यांच्या गटाला खोली, येण्याजाण्याचा खर्च आणि शिष्यवृत्ती देतात. २००३ पासून त्यांच्या २१० पैकी १८२ विद्यार्थ्यांची आय.आय.टी. मध्ये निवड झाली आहे.