Get it on Google Play
Download on the App Store

प्रफ्फुल्ल चंद्र रे


प्रफ्फुल्ल चंद्र रे भारतात जन्मलेल्या सर्वात प्रसिद्ध अशा वैज्ञानिकांपैकी एक आहेत. ते देशाच्या औद्योगिकीकरणाचे सर्वात महत्त्वपूर्ण आधार होते. त्यांनी कापड कारखाने, साबण कारखाने, साखर कारखाने, रसायन आणि चीनी मातीचे कारखाने सुरु करण्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात योगदान दिले. सन १८८९ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेंट कॉलेज मध्ये रसायन शास्त्राचे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. लवकरच त्यांना एक प्रेरणादायक शिक्षकाचा बहुमान मिळाला. आपल्या विद्यार्थ्यांवर ते फार प्रेम करत असत. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये मेघनाथ साहा आणि शांतीस्वरूप भटनागर यांच्यासारख्या यशस्वी वैज्ञानिकांचा समावेश आहे.