Android app on Google Play

 

भूमिका


भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात. या मंदिरांमध्ये, जिथे एकीकडे तांत्रिक आपल्या तंत्र - क्रियांचे प्रयोग करत असतात, तिथेच लोकांना भूत - पिशाच्च यांच्या बाधेपासून मुक्ती देण्याचे कार्यही चालते. आपण माहिती करून घेऊयात काही अशा मंदिराची, ज्यांना तंत्रीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येतं.