Get it on Google Play
Download on the App Store

पेरीस मध्ये आर्क डे त्रीउम्फ बघायला कशासाठी ? कधी आपलं इंडिया गेट बघितलत?


इंडिया गेट भरपूर प्रमाणात पेरीस मध्ये असलेल्या आर्क डे त्रीउम्फ सारखे दिसते. त्याची निर्मिती ही पेरिसच्या ‘आर्क डे त्रिओम्फ’ च्या शैलीपासून प्रेरित आहे.
नोएडा येथील शिखा वर्मा असं सांगतात, " इंडिया गेट हे दिल्लीचे भूषण आहे. ही भव्य इमारत पहिल्या जागतिक युद्धात शहीद झालेल्या  ९०,००० भारतीय सैनिकांच्या स्मृती प्रीत्यर्थ बनवण्यात आली आहे. इंडिया गेटवर आपल्याला त्या सैनिकांची नावेही लिहिलेली आढळतील. अनेक विक्रेते इथे खाद्यपदार्थ विकताना आढळतात आणि संध्याकाळच्या वेळी इथे येणे खूपच आल्हाददायक वाटते.