Get it on Google Play
Download on the App Store

व्हेनिस च्या ऐवजी अल्लेप्पी इथे भेट द्या


हॉलिडे आय क्यू चे प्रवासी अभिषेक ईश्वर असं सांगतात की, "ज्याने कोणी अल्लेप्पी या ठिकाणाला 'व्हेनिस ऑफ द इस्ट' अशा नावाने संबोधले आहे ते अतिशय योग्य आहे. या ठिकाणी सर्व बाजूंनी सौंदर्य बहरलेलं आहे. निसर्गाने तर या जागेला मुक्त हस्ताने सौंदर्य बहाल केलं आहेच, परंतु इथल्या स्थानिक लोकांनी, अगदी पंचतारांकित हॉटेलना लाजवतील इतक्या सुंदर 'बोट हाउसेस' ची व्यवस्था करून पर्यटकांना या जागेपर्यंत पोहोचणे आणि तिथला आनंद लुटणे अतिशय सोयीचे करून ठेवले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून दर्शन सहलींची सुरुवात होते आणि त्या दिवस मावळेपर्यंत सुरूच असतात. त्यानंतर 'बोट हाउस'ला विश्रांतीसाठी रात्री थांबवलं जातं. याशिवाय उंचच्या उंच नारळाची झाडे, शांत शीतल पाणी, स्वच्छ मोकळे आकाश आणि हिरवीगार बहरलेली शेतं आपल्या या सफरीला आणखीनच सुंदर आणि आल्हाददायक बनवतात.