भारताचे स्कॉटलंड म्हणजेच कुर्ग ला जा
पर्यटक मोकळेपणाने सांगतात, "कुर्ग हा आपल्या अद्भुत निसर्गसौंदर्य, नयनरम्य देखावे आणि कॉफी च्या बागांमुळे अक्षरशः स्वर्गाचा एक तुकडा वाटतो. कुर्ग ला भारताचे स्कॉटलंड असं म्हटलं जातं. हे ठिकाण पश्चिम घाटांमध्ये स्थित आहे आणि बंगलोर पासून साधारण २५२ किलोमीटर दूर आहे. तिबेटन कॉलोनी, अब्बी झरा, कावेरी – निसर्गधाम, बांबूची वने, आणि राजाची गादी पाहण्यालायक जागा आहेत. तसेच कुर्ग मध्ये ट्रेकिंग, मासे पकडणे आणि व्हाईट वाटर राफ्टींग प्रचंड लोकप्रिय आहे.