तक्रार करण्यापेक्षा जास्त कौतुक करा आणि आभार माना
आपल्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला संतुलित ठेवा. किंवा त्यापेक्षाही अधिक सकारात्मक गोष्टीना जास्त महत्त्व द्या. रोजच्या जीवनात आपल्या साथीदाराने आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आभार मानायचे विसरून जातो. मग ती गोष्ट म्हणजे घरकामात केलेली मदत असो किंवा तुमच्या आई - वडिलांबरोबर वेळ घालवणं असो. जर तुम्हाला तक्रार करायची सवय असेल तर कौतुक करणे आणि आभार मानणे या सवयी देखील स्वतःला लावून घ्या.