Get it on Google Play
Download on the App Store

बीदरचा बारिद बादशाह व त्याचं साम्राज्य

 १४९२ मध्ये कासिम बारिदद्वारे या साम्राज्याची स्थापना झाली. महमूद शाह बहमनीच्या राजवटीदरम्यान वास्तविक बारिदंच राज्य करत असत. त्यांचा १५०५ मध्ये मृत्यू झाला व नंतर त्यांचा मुलगा आमिर बारिद याने प्रधानमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली व बहमनी प्रशासनाचा कार्यभार सांभाळला. १५१८ मध्ये महमूद शाह बहमनीच्या मृत्यूनंतर एक एक करत चार सुलतान आले पण सर्वच आमिर बारिदच्या हातच्या कठपुळ्यांसारखे होते. जेव्हा शेवटचा बहुमनी राजा कल्लीमुल्लाह १५२७ मध्ये बीदरला गेला तेव्हा आमिर बारिद याने सत्तेची सूत्र हातात घेतली. १५४२ मध्ये त्याचा मुलगा अली बारिद आला ज्याने शाह ही पदवी सुरू केली. १५८० मध्ये अली बारिदच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहिम बारिद आला पण १५८७ साली त्याचेही निधन झाले व सत्ता त्याचा छोटा भाऊ कासिम बारिद द्वितीय ला मिळाली. १५९२ च्या त्यांच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा अली बारिद द्वितीय याला सत्ता मिळाली पण लवकरच त्याच्या एका नातेवाईकाने, आमिर बारिद द्वितीय, याने सत्ता काबिज केली. १६०१ मध्ये मिर्झा अली बारिदने पुन्हा सत्ता पलटली. १६०९ मध्ये शेवटचा बारिद राजा आला, आमिर बारिद तृतीय ज्याने १६१६ मध्ये मालिक अंबर च्या नेतृत्त्वाखाली मुघलांशी युद्ध केलं. १६१९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह द्वितीय याने त्यांना हरवून बिदरला विजापूर साम्राज्याशी जोडलं. आमिर बारिद तृतीय व त्याच्या मुलाला विजापूरात सक्त नजरकैदेत ठेवण्यात आलं.