मध्यकालीन वेळेचे प्रमूख हिंदू राजे- शिवाजी
अनेक
कलागुणांनी संपन्न आणि खरेखुरे आदर्श असणाऱ्या शिवाजी महाराजांनी मराठा भागात मराठा
साम्राज्य स्थापन केलं. त्यांच्या राज्यात भारताने उच्चतेची शिखरं
गाठली.
त्यांनी
एक नविन युद्धप्रणाली शोधली ज्यात शत्रूला आपलं ठिकाण कळू नं देता त्यावर हल्ला केला
जाऊ शकतो.
त्यांचं
राज्य १६३० ते १६८० पर्यंत चाललं. या काळात संपूर्ण भारत एकाच राजाच्या
सत्तेखाली होता,
ते
म्हणजे शिवाजी. त्यांना शहरी राज्य आणि पूर्ण विकसीत कायद्यांची
रूजवात करणारा राजा म्हणूनही ओळखलं जातं.
१६५७ पर्यंत शिवाजींनी मुघल साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित
केले व राखले. शिवाजींनी मुघलांशी वाद तेव्हा सुरू झाले जेव्हा शिवाजीच्या दोन अधिकाऱ्यांनी
अहमदनगर जवळच्या एका मुघल क्षेत्रावर हल्ला केला. औरंगजेबाने याचं उत्तर नसीरी खान याला पाठवून दिलं. याने शिवाजीवर मात केली. विजापूरच्या बडी बेगम हिच्या विनंतीवर औरंगजेबने आपला
मामा शाहिस्तेखान याला जानेवारी १६६० मध्ये विजापूर सैन्याशी हात मिळवून शिवाजीवर हल्ला
करण्यास पाठवले. शाहिस्तेखानाने आपल्या विशाल सैन्याच्या मदतीने पुणे आणि जवळच्याच चाकणच्या
किल्लयावर हल्ला केला. किल्ला
ताब्यात मिळवला व शिवाजींचे निवासस्थान लाल महल आपले निवासस्थान करून घेतले. एप्रील
१६६३ मध्ये शिवाजीने अचानक शाहिस्तेखानावर हल्ला चढवला व किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवला. शाहिस्तेखान पुण्याच्या बाहेर असलेल्या मुघल सैन्याच्या छावणीत शरण
गेला आणि यासाठी औरंगजेबाने त्याला बंगालला जायची शिक्षा दिली. शाहिस्तेखानाने ३ फेब्रुवारी १६६१ ला कर्तलब खान याला शिवाजींवर हल्ला
करण्यासाठी पाठवलं. उंबेर्खिंडीच्या
या युद्धात शिवाजींचं सैन्य जंगलातल्या वाटेने गेले व या सैन्याला पराजित केलं.
रागात औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याला शिवाजीला पराभूत करण्यास
पाठवले. जयसिंगच्या सैन्याने अनेक मराठा किल्ले काबिज केले ज्यामुळे शिवाजींना
औरंगजेबाशी तह करावा लागला. ११ जून
१६६५ मध्ये पुरंदर तहात शिवाजीने मुघलांना आपले २३ किल्ले व चार लाख रक्कम देण्याचे
मान्य केले. शिवाजींनी आपल्या मोहिमांमार्पत बरंच धन जिंकलं होतं पण त्यांना कुठलीच
पदवी किंवा स्थान नसल्याने कायद्याने अजूनही ते मुघलांचे कर्जदार होते. ६ जून
१६७४ रोजी शिवाजींना रायगडावर एका भव्य समारंभात मराठा साम्राज्याचा राजा घोषित करण्यात
आलं. त्यांना ’ हिंदवी धर्मोद्धारक’ या पदवीने सन्मानित करण्यात आलं.
१६७४ च्या सुरूवातीला मराठ्यांनी खान्देशावर
हल्ला करत विजापूरी पोंडा, करवार आणि कोल्हापुर जिंकलं.
शिवाजीने मार्च १६७६ मध्ये अठानीवर हल्ला केला व आणि शेवटपर्यंत बेळगाव
व वयेम रियमवर ताबा मिळवला होता. १६७६ च्या शेवटापर्यंत त्यांनी
वेरूळ आणि गिंगीमध्ये आदिलशाही किल्ले जिंकले होते. दक्षिणेतले
हे यश शिवाजींसाठी पुढच्या युद्धात खूप महत्त्वपूर्ण ठरले. गिंगी
ही मराठा स्वतंत्रता लढ्याच्या दरम्यान ९ वर्ष मराठ्यांची राजधानी राहिली.
मार्च १६८० च्या सरतेशेवटी शिवाजींना ताप आले
आणि ३ कि ५ एप्रील १६८० रोजी ५४ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. शिवाजीच्या मृत्यूनंतर
विधवा
सोयराबाई यांनी प्रशासनातल्या इतर मंत्र्यांबरोबर आपला सावत्र मुलगा संभाजी याला डावलून
आपल्या मुलाला म्हणजे राजाराम याला सिंहासनावर बसवण्याचं ठरवलं. २१ एप्रील १६८० ला १० वर्षांचा राजाराम सिंहासनावर
बसला.
पण
संभाजींनी सेनापतींना मारून रायगड किल्ला बळकावला आणि २० जुलैला सत्ता मिळवली. राजाराम, त्याची बायको
जानकीबाई व आई सोयराबाईंना अटक झाली आणि ऑक्टोबरमध्ये सोयराबाईंना कटकारस्थानाच्या
आरोपाखाली मृत्यूदंड मिळाला.