Get it on Google Play
Download on the App Store

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप मेवाड राज्याचे एक हिंदू राजपूत राजे होते. त्याच्याबरोबरचे सर्व राजपूत राजे मुघलांची गुलामी कबूल करून बसले होते ज्यात त्यांचे दोन भाऊ सुद्धा होते. अकबराने त्याला ६ वेळा संदेश पाठवले पण प्रत्येक वेळी प्रतापने त्यांचा स्विकार न करता पूर्म नम्रतेने अकबरला हे सांगितलं की सिसोदिया राजपुतांनी अजून कुठल्याच परदेशी प्रशासकाला स्वतःवर राज्य करू दिलं नाही आणि यापुढेही करू देणार नाही. काही विद्वानांचं मत आहे कि महाराणांनी अकबराशी मैत्री केलीही असती पण अकबराच्या चितूरच्या ३०,००० नागरिकांना धर्म न बदलल्यामुळे दिलेल्या मारण्याच्या आदेशामुळे महाराणांवर नकारात्मक छाप पडली आणि त्यांनी निर्णयघेतला कि ते अकबरासारख्या अन्यायी व क्रूर माणसाच्या समोर हात टेकणार नाही. अकबराने याला स्वतःचा अपमान समजला व महाराणाला धडा शिकवायचे ठरवले.

२१ जून १५७६ ला महाराणा प्रताप आणि अकबर हल्दिघाटात युद्धाच्या उद्देशाने भेटले. महाराणाजवळ १०००० सैनिक होते पण अकबराचं सैन्य यापैक्षा आठ पट होतं. हे युद्ध फक्त ४ तास चाललं पण महाराणाच्या सैन्याने मैदानात जोरदार प्रदर्शन केलं. या युद्धाचा मुघलांवर खूप खोलवर परिणाम झालात्यांची प्रचंड मालहानी व जिवीतहानी झाली. डोंगरात लपलेल्या प्रतापच्या सैन्याने मुघलांचं बरंच नुकसान केलं. अकबरने प्रतापला या दरीखोऱ्यांतून बाहेर पडण्यासाठी आणखी ३ वेळा निरोप पाठवले पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती कि जो पर्यंत ते आपल्या राज्याला स्वात्ंत्र्य मिळवून देत नाहीत तोपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यांनी जवळपास आपल्या संपूर्ण राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण जानेवारी १५९७ मध्ये मेवाडचा सर्वात मोठा नायक महाराणा प्रताप शिकारी दरम्यान एका दुर्घटनेत जखमी झाला. त्यांचा २९ जानेवारी १५९७ मध्ये ५६ वर्षांचे असताना चावंडमध्ये मृत्यू झाला. त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्ा जनतेसाठी आणि त्याहीपेक्षा आपल्या स्वाभिमानासाठी लढटा लढता प्राण सोडले.