गोलकोंडाचं कुतूबशाही साम्राज्य
या साम्राज्याची सुरूवात सुल्तान कुली कुतब उल मुल्क ने केली जो आपले काका अल्लाह आणि इतर नातेवाईकांबरोबर १६व्या शतकाच्या सुरूवातीला दिल्लीत आले होते. मग ते दक्षिणेत गेले व बहमनी राजा मोहम्मद शाहच्या सेवेत रूजू झाले. लवकरच त्यांनी गोलकोंड्यावर ताबा मिळवला, कुतूबशाहचा खिताब पटकवला व गोलकोंड्याच्या कुतूबशाही साम्राज्याची स्थापना केली. १५४३ मध्ये त्यांचा मुलगा जमशेदने त्यांचा खून करून सत्ता मिळवली १५५० मध्ये त्यांच्याही मृत्यूनंतर त्यांचा छोटा मुलगा राज्य करू लागला पण अधिकाऱ्यांनी त्याला हाकलून लावलं आणि इब्राहिम कुलीला सुल्तान बनवल.
मोहम्मद कुली क़ुतुब शहाच्या च्या शासन काळात हिन्दू अणि मुस्लिम यांचे सम्बन्ध मजबूत झाले अणि हिन्दू लोकाना कुतुबशाहित उच्च पदावर बसले त्यांच्यात प्रमुख होते मदनना अणि अकान्ना हे मंत्री. गोलकोंडा अणि चार मीनार यांच्या बांधकामा नंतर हैदराबाद ही या राज्याची राजधानी बनली. यादोन्ही शहरांना क़ुतुब सुलतानानी वसवले. या साम्रज्याने १७१ वर्षे गोलकोंडा वर राज्य केले अणि १६८७ मध्ये मुग़ल बादशाह औरंगजेबाने त्यांच्या राज्यवार कब्ज़ा केला.