Get it on Google Play
Download on the App Store

बाजीराव

बाजीराव एक प्रसिद्ध सेनापति होते जे मराठा राज्याच्या चौथ्या छत्रपतींचे (राजा) छत्रपची शाहू राजे भोसले, यांच्या राज्यात १७२० पासून आपल्या मृत्यूपर्यंत मराठा पेशवा (प्रधान मंत्री) म्हणून कार्यरत होते. बाजीरावांनी जवळपास ४१ युद्ध लढली आणि असं म्हणतात की त्यांना एकदाही पराभव पत्करावा लागला नाही. त्यांना मराठा राज्याचं क्षेत्र वाढवण्याचं श्रेय दिलं जातं. विशेषतः उत्तरेत ज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मुलगा २० वर्षांच्या राज्यात उच्चतची शिखरं गाठू शकला. बाजीरावांना नऊ मराठी पेशव्यांपैकी सर्वात प्रभावी मानलं जातं. इसं म्हणतात की तेहिंदू पद पदशाही’ (हिंदू राज्य )च्या स्थापनेसाठी सुद्धा लढले होते.

बाजीरावांचा जन्म मराठी चित्पावन ब्राह्मण कुटूंबात छत्रपती शाहुंच्या पहिला पेशवा बालाजी विश्वनाथच्या मुलाच्या रूपात झाला. जेव्हा ते वीस वर्षांचे झाले तेव्हा त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शाहूंनी अनेक जुन्या व अनुभवी दावेदारांना दुर्लक्षून पेशवा घोषित केलं. त्यांच्या नियुक्तीमुळे हे कळतं की शाहुंना त्यांच्या कौशल्याची किशोरावस्थेतच कल्पना आली होती आणि म्हणूनच त्यांना पेशवा घोषित करण्यात आलं. बाजीराव आपल्या सैन्यात खूप लोकप्रिय होते व आजही त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं

बाजीरावांनी मस्तानीला आपल्या दुसऱ्या बायकोचा दर्जा दिला. ती पन्नाचा राजा छत्रसालच्या फारसी मुस्लिम बायकोपासूनची मुलगी होती. मस्तानी एक प्रतिभावान आणि सुंदर राजकुमारी होती व तिला घोडस्वारी, तलवारबाजी, युद्धनिती, धार्मिक अध्ययन, कविता, संगीत आणि नृत्य यांत पारंगत होती. याचसाठी ती बाजीरावांना आवडली. तिने त्याच्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला ज्याचं नाव जन्माच्या वेळी कृष्णराव ठेवलं गेलं होतं. संधीचा फायदा घेऊन स्थानिक ब्राह्मण राजनेत्यांनी त्या मुलाला शुद्ध हिंदू ब्राह्मण म्हणून स्विकार करण्यास नकार दिला कारण त्याची आई मुस्लिम होती. त्यांनी या लग्नालाही मान्यता दिली नाही. मस्तानी व पुण्याच्या रूढीवादी हिंदू समाजात यामुळे दरी निर्माण झाली व पेशव्यांच्या कुटूंबात एक नविन संकट उभं राहिलं.  

बाजीरावांचा मृ्त्यू २८ एप्रील १७४९ ला खूप कमी वयात झाला. त्यांना आपल्या जहागिरदारांच्या परिक्षणात असताना अचानक ताप आला, कदाचित उष्णतेमुळे. आणि त्यांचं ३९ वर्षांच्या वयात निधन झालं. ते १००००० सैनिकांसोबत दिल्लीला जात होते व इंदोर शहराजवळ खर्गोने या भागात थांबले होते. २८ एप्रील १७४० ला त्यांचे अंतिमविधी रावेरखेडात नर्मदा नदी किनारी खर्गोनेच्या जवळ केले गेले. त्यांच्या आठवणीत सिंदीयांनी एक स्मारक उभारलं. त्यांचं निवासस्थान एका शिवमंदिरापाशी आहे.

यश व संपत्ती

शनिवारवाडा पुणे किल्ल्याचा आर महल, मराठा राज्याच्या पेशवा राजांच्या सिंहासनाची स्थापना बाजीरावांनी केली होती. बाजीराव, ज्यांनी  ४१ पेक्षा जास्त मोठी युद्ध आणि अतरही काही युद्ध लढली, यात त्यांना कधीच कोणी पराभूत करू शकलं नाही असं सांगितलं जातं. ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी आपल्या वडिलांसारखं मुघल साम्राज्याच्या दुबळ्या सत्तेच्या उणिवांना ओळखलं व त्याया स्वतःसाठी फायदा करून घेतला. मुघल दरबारात सैयद बंधूंच्या कमी होत जाणाऱ्या सन्मानाचा फायदा घेऊनही त्यांनी हल्ला करायला निर्णय घेतला.

नंतरचे साम्राज्य ग्वालियरचे सिंदीया (रानोजी शिंदे), इंदोरचे होळकर (मल्हारराव), बडोद्याचे गायकवाड (पिलाजी), आणि धरचे पवार (उदयजी) हे बाजीरावांमार्फत मराठा साम्राज्य वाढवायला व मुघल सत्तेला पराभूत करण्यास स्थापन केले गेले. यासाठी त्यांनी आपल्या जहागिरदारांना जबाबदारी दिली. त्यांनी आपला निवास सासवड आणि मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानीला १७२८ मध्ये साताऱ्यातून पुण्यात हलवलं. या प्रक्रियेत त्यांनी एकएक कसब्याला मोठं शहर बनवण्याचा पाया घातला. त्यांचे सेनापती बापूजी श्रीपत यांनी साताऱ्याच्या अनेक श्रीमंतर परिवारांना पुणे शहरात , जे तेव्हा पेठा-पेठांमध्ये वसलं होतं, इथे येऊन वास्तव्य करण्यास राजी केलं. १७३२ मध्ये राजा छत्रसाल जे मराठा साम्राज्याचे जुने मित्र होते यांचं निधन झालं व त्यानंतर बाजीरावांना छत्रसालच्या बुंदेलखंड राज्याचा एक तृतीयांश भाग मिळाला.

एक महान सेनानेता बाजीराव यांना त्याच्या सैन्याकडून व प्रजेकडून भरपूर प्रेम मिळालं. असं म्हणतात की त्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठीही युद्ध केलं व मुघलांना मध्य व पश्चिम भारतातून पुर्णपणे उलथून लावण्यासाठी उत्तरेला आपलं ध्येयं बनवलं. त्यांच्या नेतृत्त्वात मराठा साम्राज्याने सिद्दी, मुघल, पोर्तुगाल, निजाम आणि बंगाल्यांना पराभूत केलं.

त्यांना शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य जे भारतीय उपखंडात पूर्ण १८वं शतक आणि इंग्रजांच्या येण्याआधी १९व्या शतक राज्य गाजवणार होतं, या साम्राज्याचा एक महत्त्वाचा स्तंभ मानलं जातं