शांती देवी
१९२६ साली ४ वर्षांच्या शांती देवी ह्या मुलीने आपले खरे नाव लुगडी देवी असल्याचे सांगायला सुरुवात केली. तिच्या आई वडिलांना भयाने कापरे भरले. पण कुणी तरी हि माहिती महात्मा गांधी च्या कानावर घातली आणि त्यांनी स्वताहून ह्या घटनेची चौकशी करण्या करिता काही लोकांना पाठवून दिले. यथाअवकाश खरोख लुगडी देवी नावाची एक स्त्री ४ वर्षें आधी एका गावांत मरण पावली होती हे सत्य समोर आले. लहानगया शांती देवीने गावाचे नाव, आपले पती आणि गावातील इतर अनेक लोकांना ओळखले.
गांधीजींच्या समितीने निष्कर्ष काढला कि शांती देवी खरोखर लुगडी देवीचा पुर्नजन्म आहे.
शांती देवी ह्यांचा वयस्क झाल्या नंतरचा फोटो.