जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव :बुलक होटेल – डेड वुड साउथ डकोटा
कोणीहि इतिहासाचा शौकीन असलेला अमेरिकन ज्याने एचबीओ वरील डेडवूड हि मलिका पहिली आहे तो सांगू शकेल कि शेरीफ सेठ बुलक त्याच्या काळातील किती प्रसिद्ध आणि कडक कायद्याचा रक्षक होता. शेरीफ बुलक त्यावेळचा फारच खतरनाक माणूस होता आणि त्याची फक्त नजरच गुन्हेगारास रोखण्यासाठी पुरेशी होती. बुलक आणि त्याचा मित्र सोल स्टार याने आपला हार्डवेअर चा व्यापार १८७६ मध्ये हेलेना, मोन्टाना इथे हलवला. त्यांचा उद्योग लवकरच सफल देखील झाला आणि त्यांनी मेन आणि वोल स्ट्रीट मधील संपत्तीदेखील विकत घेतली जेथे आजचे बुलक हॉटेल स्थित आहे.
मोन्टाना येथे लेविस आणि क्लार्क कौंटीचे शेरीफ असल्याने ऑगस्ट १८७६ मध्ये वाईल्ड बिल हिचकॉक याची अवेळी हत्या झाली त्यामुळे बुलक याला डेड वूड चा शेरीफ बनवले गेले. शेरीफ बुलक याने आपल्या दलात अनेक बहादूर लोकांची भारती केली ज्यांचे काम होते शहरातून वाईट गोष्टीना दूर करणे. लवकरच गुन्हेगारी जगताचे वर्चस्व संपून कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आले.
१८७९ मध्ये हार्डवेअर दुकानाला आग लागली तेव्हा डेड वूड वाचला परंतु १८९४ मध्ये पुन्हा आग लागली तेव्हा दुकान पूर्णपणे नष्ट झाले. आपला हार्डवेअरचा धंदा पुन्हा सुरु करण्याऐवजी बुलक आणि स्टार यांनी तिकडे डेड वूड नावाने सुंदर हॉटेल सुरु केले.
शेठ बुलक याचा २३ सप्टेंबर १९१९ रोजी साउथ डाकोटा येथे बेले फोर्चे येथील आपल्या घरात कॅन्सर ने मृत्यू झाला. त्याला माउंट मेरी काब्रीस्तानाच्या पुढे व्हाईट रॉक्स येथे जाणाऱ्या रस्त्यावर दफन केले गेले. पण अनेक लोकांना असे वाटते ती कि त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याऐवजी तो आजसुद्धा आपल्या हॉटेलात वास्तव्य करून आहे. पश्चिमेकडील सर्व शहरांमध्ये सर्वात हिंसक शहर असलेल्या डेड वूड मध्ये अनेक लोक बंदूक, चाकू, खून,मारामाऱ्या यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अनेक लोकांनी बुलक हॉटेल मधून चित्रविचित्र प्रकारांचा अनुभव घेतला आहे. काही खोल्यांत कोणीही उपस्थित नसताना आवाज भूतांचे दिसणे याचा अनुभव घेतला आहे. बुलक हॉटेल हे पूर्णपणे भुताटकी ने वेढलेले ठिकाण आहे.
तर सांगा हे सर्व वाचल्यानंतर तुम्ही म्हणाल का कि भुते नसतात?