Get it on Google Play
Download on the App Store

जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : विंचेस्टर मिस्ट्री हाउस – सन होसे कैलिफ़ोर्निया

विंचेस्टर मिस्ट्री हाउस इतके जगातील कोणतेच स्थान भुताटकी साठी प्रसिद्ध नसेल. १८४४ मध्ये विंचेस्टर रायफल याची वंशज साराह विंचेस्टर ने हे सुरु केले होते. हा महाल पहिले ६ खोल्यांचा होता. आज या महालात १६० पेक्षा अधिक खोल्या आहेत आणि हे एखाद्या षडयंत्र किंवा भूलभुलैय्या सारखे आहे. आपला पती रायफल याचा व्यापारी कारणांमुळे झालेल्या मृत्यूस स्वत:ला जबाबदार मानणारी श्रीमती विंचेस्टर भुतांच्या भीतीने ४० वर्षांपर्यंत या घराचे बांधकाम करत राहिल्या.  असे मानले जाते कि श्रीमती विंचेस्टर यांना हे बांधकाम चालूच ठेवण्यासाठी भुतांनी उद्युक्त केले होते...एक असे घर ज्याचे बांधकाम कधीच पूर्ण होत नाही. असेही मानले जाते कि साराह यांनी हे घर भूतांना चकवण्यासाठी बांधले ज्यायोगे भुते त्या खोल्यामध्ये कैद होतील आणि साराह यांना त्रास देणे बंद करतील. आपल्या उतार वयात साराह भुते दिसू नयेत म्हणून रोज रात्री वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपत असत.   

 

आज हे घर एक पर्यटन स्थळ आहे. सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या या  विंचेस्टर मिस्ट्री हाउस मध्ये ऑटोमेटिक विजेची बटणे, किमान ५० चिमण्या, लाकडाची जमीन आणि भव्य शांडलिअर आहेत. प्रत्येक खिडकीवर १३ आरसे आहेत, प्रत्येक मजल्यावर १३ भाग आणि एक आड एक सोडून १३ पायऱ्यांचे जीने आहेत. आणि मी तुम्हाला सांगितले का या घरात असे जिने आहेत जे कुठेच जात नाहीत?

 

साराह विंचेस्टर आपल्या काळातील अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि ऐटदार स्त्रियांपैकी एक होती. त्यांना असे वाटे कि विंचेस्टर राइफल्सनी मारल्या गेलेल्या लोकांच्या अनेक आत्मा त्रास देत असाव्यात.याव्यतिरिक्त घराच्या आसपासच्या भागात अनेकदा भुते दिसली आहेत आणि पाहुण्यांना अज्ञात आवाज आणि पायांची चाहूल, कोणीच खोलीत नसताना आपोआप दरवाजे बंद होणे असे प्रकार दृष्टीस पडले आहेत. थंड जागा आणि प्रकाशग्रह देखील पाहण्यात आले आहेत.

 

भूत : सत्य की असत्य

भयकथा संपादक
Chapters
भूमिका भूत म्हणजे काय? परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व प्रकार स्पष्ट झलक जीवंत व्यक्तीचे भूत निर्जीव वस्तु भूत प्राण्यांची भुते अमानवी भुते अनेकपतिका भूतांचे फोटो, आकृती, प्रकाशग्रह, चक्र आणि पूर्ण शरीर जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : द गुर्डोन लाइट जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : बोरले रेक्टोरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : ब्राउन लेडी ऑफ़ रायन्हम हॉल जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : मोस बीच डिस्टिलरी – मोस बीच कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : विंचेस्टर मिस्ट्री हाउस – सन होसे कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : लेम्प मेन्शन एंड ब्रेवरी – सेंट लुइस मिस्सौरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव :बुलक होटेल – डेड वुड साउथ डकोटा