स्पष्ट झलक
अंकित होणारी भुते गैर परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व श्रेणीत मोडतात कारण त्यांची रूपरेखा किंवा हालचाली मानवीय असतात परंतु आपल्या परिस्थिती बाबत ते संपूर्णपणे अज्ञ असतात. आणखी एक गोष्ट जी या प्रकारच्या भूतांना परस्पर संवादात्मक भूतापेक्षा निराळी बनवते ती म्हणजे यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची सवय असते. एकाच गल्लीतून एकसारखे बाहेर निघणे किंवा एकाच खिडकीतून पुन्हा पुन्हा वाकून पाहणे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिक असतात. दर्शक अशा व्य्कातीमात्त्वाशी संपर्क करू शकत नाहीत आणि हि भुते पुन्हा पुन्हा करत असलेली गोष्ट थांबवू शकतात नाहीत.
अंकित होणे हे नाव याच गोष्टीशी निगडीत आहे कि भुते एखादी जागा किंवा वागणूक यांच्यात अडकलेले म्हणजेच अंकित असतात.
काही लोक असा दावा करतात कि हि खरोखरची भुते नाहीतच, परंतु एखादी व्यक्ती जी इकडे राहत असे आणि त्याची रोजच्या दिनक्रमातील एखाद्या हालचालीचे एक प्रेतात्मवादी प्रतीक आहे. हे प्रतीक एखाद्या वातावरणात कैद असते आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अडकल्यामुळे किंवा लोकांनी पहावी म्हणून पुन्हा पुन्हा समोर आणले जाते.