अमानवी भुते
वरील व्यक्तिमत्त्वाशी निगडीत भुतांच्या व्यतिरिक्त अमानवी भूते एखाद्या दुसऱ्या घरातील व्यक्तीप्रमाणे नेहमीच दुसऱ्या दुनियेतील लोकांच्या आत्म्याच्या रुपात जन्माला येतात. ती भुते बुद्धिमान असतात आणि एकमेकांशी संवाद देखील साधू शकतात. ते मानवांप्रमाणे वेळ, अंतराळ आणि नैतिकता अशा बंधनात अडकलेले नसतात. त्याचे ज्ञान जुन्या काळाशी निगडीत असते आणि ते एखाद्या दुसऱ्या काळातून आपल्या काळात प्रवेश करतात. अशी भुते दर्शकाशी एखाद्या देवदूता प्रमाणे काही शिकवण्याच्या हेतूने संवाद करतात.अनेकदा हे जमिनीवर राहतात आणि दिसत नाहीत. काहींचे हेतू चांगले असतात तर यातील काही भुते दुष्ट सुद्धा असू शकतात.