द इसदाल वुमन
द इसदाल वुमन हा एक असा विषय आहे ज्यामध्ये बार्गेन , नॉर्वे , २९ नोव्हेंबर १९७० रोजी इस्दालेन व्हॅली मध्ये एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले जे कि अजून हि न उलगडलेले कोडे आहे. हि घटना नॉर्वेमधील सर्वात जास्त चमत्कारिक गूढ आहे, कित्येक वर्ष या केस मध्ये तीव्र अनुमान लावले जात आहेत कि नेमका कसा बळी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि कोणती करणे या मृत्यूमागे असतील. लोकांचे कुतूहल या केस मध्ये नेहमीच लक्षणीय राहिले.
इस्दालेन जे कि "डेथ व्हॅली" म्हणून प्रसिद्ध आहे त्या भागामध्ये हि महिला सापडली, हा भाग माउंट युल्रीकेन च्या दिशेने आहे. घटनास्थळी पोलिसांना एक जळालेला पासपोर्ट सापडला. शाव्विच्चेदानामध्ये आढळून आले कि या महिलेवर मानेवर अबोठात वस्तूने अनेक जोरदार जखमा केल्या आहेत आणि मारण्यापूर्वी तिने बर्याच झोपेच्या गोळ्या घेतलेल्या होत्या. अधिकृत पोलिसांच्या अहवाला च्या निष्कर्षा नुसार हि एक आत्महत्या होती पण हा निष्कर्ष अत्यंत वादग्रस्त होता.
अन्वेषण
२९ नोव्हेंबर १९७० रोजी , जवळपास १३:१५ वाजता, माउंट उल्रीकेन च्या उत्तर भागामध्ये एक प्रोफेसर त्यांच्या दोन मुलींसह फिरायला आले असताना दूरवर हायकिंग च्या मागावर दगडांच्या मागे त्यांना एका अंशतः जळलेल्या स्थितीमध्ये एक नग्न महिला आढळून आली.घटना स्थळावर त्यांना डझन भर गुलाबी रंगाच्या झोपेच्या गोळ्या, खाण्याचा डबा, एक अर्धी संपलेली दारूची बाटली आणि दोन प्लास्टिक च्या बाटल्या सापडल्या ज्यांमधून गॅसोलीन चा वास येत होता. खुनाचे अन्वेषण तातडीने चालू केले गेले आणि हा खूनाचा खटला बार्गेन पोलीसान साठी आता पर्यंतचा सर्वात जास्त व्यापक असा खटला होता.
तिचा मृत्यू कार्बन मोनॉक्साईड आणि जालन्याच्या संयोगामधून झाला होता. आणि शवविच्छेदन मध्ये तिच्या शरीरामध्ये किमान ५० झोपेच्या गोळ्या घेतलेल्या दिसून आले. तिच्या मानेवर एक खोलवर जखम होते , जसे कि हवा फुंकली गेली असावी.
तपास
बार्गेन मध्ये एनएसबी स्टेशन जवळ सापडलेल्या दोन सुटकेस च्या माध्यमातून पोलिसांनी त्या महिलेचा माग घेतला. पोलिसांना असे हि आढळून आले कि तिने घातलेल्या प्रत्येक एक कपड्याचे लेबल काढून टाकण्यात आले होते आणि तिच्या बोटांचे ठसे घासून टाकण्यात आले होते.
या व्यतिरिक्त पोलिसांना लोशन चे नाव लिहिलेली एका औषधाची चिट्ठी सापडली ज्यामध्ये हि डॉक्टरांचे नाव आणि तारीख या दोन्ही हि गोष्टी खोडलेल्या होत्या. एका सुटकेस च्या आतल्या बाजूला ५०० जर्मन मार्क सापडले. काही फुटक्या ग्लासांच्या काचेच्या तुकड्यांवरती पुसटसे बोटांचे ठसे हि सापडले. ओळख पटवण्यासाठी ते अपुरे होते पण पोलीसांच म्हणन ठरलं कि ते मृत महिलेचे होते. पोलिसांनी साक्षीदारांच्या वर्णनानुसार संमिश्र असे स्केचेस आणि महिलेच्या मृत शरीरावरून विश्लेषण बनविले ; स्केचेस माध्यमा च्या मार्फत प्रकाशित केले आणि इंटरपोल च्या मदतीने वेगवेगळ्या देशांमध्ये सर्वत्र पसरवून दिले .
पोलिसांना अखेरीस असा तपास लागला कि मृत महिलेने नॉर्वे आणि युरोप च्या आसपास, विविध नऊ ओळखी धारण करून प्रवास केला होता - Jenevive Lancia, Claudia Tjelt, Vera Schlosseneck, Claudia Nielsen, Alexia Zarna-Merchez, Vera Jarle, Finella Lorck and Elizabeth Leen Hoywfer. या सगळ्या ओळखी हि बनावटी होत्या. तिला पाहिलेल्या साक्षीदारांच्या मतानुसार मृत महिलेने अनेक केसांचे टोप वापरले होते आणि एका ट्रंक मध्ये गूढ अर्थ असलेल्या डायरी नोंदी सापडल्या.लिहिलेल्या गूढ संकेत शब्दांचा जेंव्हा पोलिसांनी अर्थ लावला तेंव्हा पोलिसांना असे लक्षात आले कि ती वेगवेगळ्या ठिकाणांची नावे आणि तारखा होत्या ज्यांना तिने आधी भेटी दिलेल्या होत्या. शरीराच्या विश्लेषण मध्ये जेंव्हा तिच्या दातांची पूर्णपणे तपासणी केली तेंव्हा असे लक्षात आले कि ती लॅटिन अमेरिकेमध्ये हि दंतवैद्य कडे गेलेली होती.
साक्षीदारांच्या जबाबानुसार मृत महिलेला अनेक भाषा अवगत होत्या. फ्रेंच , जर्मन , इंग्लिश आणि डच. बार्गेन मधल्या अनेक हॉटेल मध्ये तिने मुक्काम केला होता. हॉटेल मध्ये चेक इन केल्यापासून तिने सतत वारंवार रूम बदली केल्या होत्या जेंव्हा तिला रूम बाल्कनी शी सलग्न असलेली हवी होती. ज्या पेपर वरती तिने चेक वरती सही केली होती त्यावरून असे दिसून येत होते कि ती एक विक्रेती आहे आणि पुरातन वस्तू जमाविते. त्या महिलेला नक्कीच दुधासोबत पोरीज हा पदार्थ आवडत असला पाहिजे हा अंदाज बांधला गेला , कारण जवळपास सगळ्याच हॉटेल मध्ये जिथे ती राहिली होती तिची शेवटची खाण्याची ऑर्डर हीच होती.
जेंव्हा त्या महिलेची सुटकेस सापडली तेंव्हा पोलिसांनी शहरातील सगळ्यात नामवंत प्रमुख कापड विक्रेत्याला तिच्या ड्रेस ची ओळख पटविण्या करिता बोलाविले. त्या वरून असा निष्कर्ष काढण्यात आला कि , तिचा पेहराव जरासा चिथावणी देणारा असा असे आणि तिच्या पेहरावाच्या पसंतीवरून तिला इटालीअन शैलीची झाक असणाऱ्या कपड्यांमध्ये रुची होती असे दिसून आले.
तपासाच्या सुरुवातीला पोलिसांनी एका इटलीअन छायाचित्रकाराला बोलाविले ज्याने त्या महिलेला गाडीमध्ये लिफ्ट दिली होती आणि तिच्यासोबत हॉटेल अलेक्झांड्रा , लोएन येथे रात्रीचे जेवण हि घेतले होते. या इटलीअन ला या पूर्वी हि एका बलात्काराच्या खटल्या संबधी बोलावले गेले होते आणि विचारणा केली गेली होती पण त्यातून तो सहीसलामत सुटला होता. नॉर्वे मध्ये विकली जाणारी इटलीअन पोस्टकार्डे हि महिलेच्या सामानातून मिळाली. छायाचित्रकाराने असे हि सांगितले कि या महिलेने आपण साऊथ आफ्रिकेतील उत्तरेकडच्या जोहॅनेस्बर्ग नामक एका लहान शहरामधून आलेली आहे आन तिच्याकडे नॉर्वे मधील सुंदर स्थळे पाहण्या साठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. तपासाच्या या धाग्यामधून पुढच्या तपासा साठी आणि महिलेच्या ओळखी साठी कोणत्या हि प्रकारचे नवीन संकेत मिळाले नाहीत.
शेवटच्या वेळी या इसादाल महिलेचे झालेले निरीक्षण म्हणजे जेंव्हा तिने हॉटेल मरीन मधील रूम ४०७ सोडली होती. तिने रोख पैसे दिले आणि टॅक्सी पिक अप साठी विचारले. महिलेचे वर्णन ३० - ४० वर्षीय , १६४ सेमी. उंच, रुंद नितंब , लहान खुरे डोळे, आणि दिसायला देखणी असे केले गेले होते. हॉटेल कर्मचार्यांनी सांगितले कि ती सहसा आपल्या रूम मधेच राहत असे आणि अस वाटत होती कि पाळतीवर आहे. आणि एका हॉटेल मधील राहायला आलेल्या व्यक्तीने पोलिसांना ती साउथ स्टेट सिगारेट ओढत असल्याचे सांगितले, जो कि स्थानिक नोर्वेजिअन ब्रांड आहे.
आणि एका साक्षीदाराच्या साक्षीमध्ये त्याने सांगितले कि ती महिला एका माणसाला बार्गेन हॉटेल मध्ये, एका मोठा सभागृह मध्ये मोठ्या आवाजामध्ये बोलताना ऐकले होते आणि ती त्याला उद्देशून म्हणाली होती, "Ich komme bald" ज्याचा जर्मन भाषेमध्ये अर्थ मी लवकर च येत आहे असा होतो.
शेवटचे क्षण
२४ नोव्हेंबर रोजी, महिलेचा तपास लागण्या पूर्वी पाच दिवस, एक स्थानिक तरुण आपल्या मित्रांसोबत त्याच भागामध्ये हायकिंग करत होता. त्याने तिथे एका विदेश महिलेला पहिले असल्याचे सांगितले जिचा चेहरा भयग्रस्त दिसत होता. त्याने पहिले कि त्या महिलीने व्यवस्थित कपडे परिधान केलेले होते जरी ते बाहेर जाण्या साठी आणि रात्री उशिराने एकट्याने हायकिंग करण्या साठी तितकेसे योग्य नव्हते. जेंव्हा ते एकमेकांच्या शेजारून गेले तेंव्हा तिला काही तरी सांगायचे असा चेहरा तिने केला होता पण तिच्या मागावर असणाऱ्या दोन काळे कोटधरी माणसांकडून धमकीवजा भीतीने ती काही बोलली नाही. ती दोघे मनसे हि विदेशी वाटत होती. त्या २६ वर्षीय तरुणाने पोलिसांना संपर्क साधला जेंव्हा त्याला त्याच भागामध्ये त्या महिलेच्या मृत होण्याची बातमी कळाली.त्याने तिला स्केचेस वरून लगेचच ओळखले परंतु त्याच्या मतानुसार ज्या पोलिसांशी तो बोलला होता त्यांनी त्याला असे उत्तर दिले . "हे सारे विसरून जा . तिला पाठवून दिले आहे. हि केस कधीच सोडवली जाणार नाही " त्याने हा सल्ला मानला आणि सार्वजनिक रित्या आपले मत मांडायला त्याला ३२ वर्षांचा कालावधी लागला.