"तमाम शुड केस" ७० वर्षापासून तपास सुरु असणारी रहस्यमयी खुनाची केस
१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केस चा तपास काही प्रमाणात चालू आहे.
शवाच्या कोट मध्ये एक सिगारेट चे पाकीट जयंत ७ सिगारेट होत्या, एक फणी, एक रेल्वेचे वापरलेले तिकीट, एक बसचे न वापरलेले तिकीट आणि एक माचीस सापडले. कपड्याची लेबल काढून टाकली गेलेली होती. क्तुहाल्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा पैसे त्याच्या शरीरावर नव्हते. प्रत्यक्ष दर्शी लोकांनी आधीच्या दिवशी सुमारे संध्याकाळी ७ वाजता मृत व्यक्तीप्रमाणे एका व्यक्तीला त्याच जागेवर झोपलेले पहिले होते. काही लोकांनी त्याला आपला हात उंचावताना पहिले होते आणि नंतर तोच हाथ खाली पडताना सुद्धा पहिले होते. अंधारामुळे मृत व्यक्ती तीच होती हे सांगणे अवघड होते.
१९५९ साली म्हणजे तब्बल दहा वर्षांनी काही लोकांनी पोलिसांना सांगितले कि आधीच्या रात्री एका अतिशय छान पैकी कपडे घातलेल्या माणसाला त्यांनी दुअसर्य माणसाला खांद्यावरून वाहून नेताना त्यांनी पहिले होते.
डॉक्टर च्या रिपोर्ट प्रमाणे मृत व्यक्तीचे आरोग्य अतिशय सुदृढ होते. वांशिक दृष्टीकोनातून माणूस इंग्रज वाटत होता, पायाचे स्नायू अतिशय बळकट असून हाथ आणि नखे पाहून ह्यामानास्ने शारीरिक कष्टाचे काम केले असेल असे वाटत नव्हते. मृत व्यक्तीने टोपी घातली नव्हती जे १९४८ सालच्या पद्धती प्रमाणे विचित्र होते. पोस्ट मार्टम मध्ये असे लक्षांत आले कि मृत व्यक्तीने ३-४ तास आधी एक पेटिस खाल्ला होता. शरीरांत काहीही विष सापडले नव्हते. किडनी, लिवर, आतडी ह्यातील सूज पाहून मृत्यू नैसर्गिक नव्हता हे मात्र स्पष्ट होते.
१९५२ साली इंग्लंड मधील स्कॉटलंड यार्डने तपास कामात भाग घेतला. जाघ्भर ह्या माणसाचे फोटो प्रकाशित करण्यात आले पण ओळख पटविण्यास कोणीही समोर आला नाही.
3 December 1948 रोजी काही वर्तमान पात्रांनी हा माणूस E C Johnson आहे असे प्रकाशित केले होते पण सदर माणूस पोलिस स्टेशन मध्ये येवून आपण जिवंत आहोत हे दाखवून गेला. काही महिन्यांनी एका माणसाने आपण सदर माणसाला एका बार मध्ये दारू पिताना भेटलो होतो आणि त्या माणसा जवळ मिलिटरी ओळखपत्र होते असे सांगितले. पोलिसांनी सर्व मिलिटरी रीकोर्ड शोधले पण सदर माणूस त्यांना त्यात सापडला नाही. वाल्श नावाचा एक लाकूड तोडा गायब झाला होता ज्याचा चेहरा सदर माणसाशी अतिशय साम्य दाखवत होता पण सदर माणसाच्या एका मैत्रिणीने त्याचे शरीर पाहून त्याला ओळखण्यास नकार दिला त्या शिवाय काही व्रण जे वाल्श च्या शरीरावर होते ते मृत व्यक्तीच्या शरीरावर नव्हते.
१४ फेब्रुवारी १९४८ मध्ये बस सस्टेशन च्या लोकर रूम मध्ये एक सुटकेस सापडली जी मृत व्यक्तीची असावी असा कयास पोलिसांनी लावला. त्यात एक झगा, ४ चड्ड्या, एक चाकुची म्यान, एक कैची, एक चप्पल असे समान सापडले. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया मध्ये न सापडले जाणारा एक विशेष प्रकारचा धागा पोलिसांना सापडला. हाच धागा मृत व्यक्तीच्या कोटाच्या खिश्याला रफू करण्यासाठी वापरला गेला होता त्यामुळे सुटकेस त्याच व्यक्तीची होती हे सिद्ध झाले. कैची आणि चाकू ज्या परकराचे होते त्या प्रकारचे चाकू आणि कैची फक्त खलाशी वापरात असत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुटकेस मध्ये पेन्सिल आणि कागद होते पण काहीही पत्रव्यवहार नव्हता. तसेच सुटकेस मध्ये एकही पायमोजा पोलिसांना सापडला नाही. सुटकेस ज्या वेळी लोकर रूम मध्ये ठेवली होती त्यातून हे सिद्ध झाले कि रेल्वेचे तिकीट जे मृत व्यक्तीच्या खिश्यात सापडले गेले होते ते वापरले गेले नव्हते आणि ह्या माणसाला कदाचित ती ट्रेन चुकली होती.
जून १९४९ मध्ये पुन्हा मृत शरीराची चाचणी करण्यात आली. एका विष विशारद प्राध्यापकाने दोन प्रकारच्या विषामुळे मृत्यू झाला असेल असा कयास केला. १९८० साला पर्यंत अमान्य लोकांना ह्या विषाचे नाव सांगण्यात आले नव्हते. पण डॉक्टर च्या म्हणण्या प्रमाणे मृत व्यक्तीच्या शरीरावर उलटी किंवा फेस नव्हता त्याशीवन माणसाचे बूट इतके साफ होते कि कुणी तरी मारून त्याला तिथे टाकला असण्याची शक्यता जास्त होती.
The Rubaiyat of Omar Khayyam
ह्या केस चा खरा धक्का मात्र जुलै मध्ये आला. मृत व्यक्तीच्या पायजम्याची जेंव्हा पुन्हा परीक्षण केले तेंव्हा त्याच्या पायजाम्यात एक गुप्त खिसा आढळून आला जो शिवून ठेवला होता. शिवान उसवल्या नंतर आतून एक छोटासा कागदाचा तुकडा आला जो जणू काही कुठल्या पुस्तकापासून फाडून काढला असावा असे वाटत होते. पोलिसांनी ते कोणते पुस्तक असावे हे शोधून काढले. सदर पुस्तक १८८० साली प्रकाशित करण्यात आलेले आणि न्यूझीलंड मध्ये छापण्यात आलेले उमर खय्याम ह्याचे रुबयीयात हे असावे हे स्पष्ट झाले. जो तुकडा फाडण्यात आला होता ते शेवटच्या पानाचा शेवटचा तुकडा होता ज्यावर "तमाम शुद" अशी अक्षरे होती ज्याचा अर्थ फारसी मध्ये "The End" किंवा "समाप्त" असा होतो.
पुस्तकाची ओळख जरी समजली तरी पोलिसांना जे पुस्तक ज्याच्या पासून तो तुकडा फाडला होता ते सापडले नाही पण पोलिसांनी संपूर्ण देशांत त्या पुस्तकाचा शोध घेतला आणि शेवटी एका पानासाने पोलिस स्टेशन मध्ये येवून एक पुस्तक पोलिसांना दिले जे त्या व्यक्तीला आपल्या गाडी मध्ये सापडले होते. सदर व्यातीचे नाव पोलिसांनी सांगितले नाही पण त्याने आपली गाडी त्याच बीच वर ठेवली होती आणि कुणीतरी त्याच्या मागच्या सीट वर हे पुस्तक टाकले होते. नक्की कुठल्या दिवशी ते पुस्तक सापडले हे मात्र स्पष्ट झाले नाही, काही अहवाला प्रमाणे ते पुस्तक मृत व्यक्ती सापडल्या नंतर सापडले होते तर काही अहवाला नुसार ते २ आठवडे आधी त्या गाडी मध्ये सापडले होते.
अनेक शास्त्रज्ञांनी पुस्तक अभ्यासून तो तुकडा त्याच पुस्तकाचा होता हे सिद्ध केलेच त्या शिवाय त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दुसरा कागद ठेवून कुणीतरी काही तरी लिहिले होते हे स्पष्ट झाले आणि त्या अक्षरांची प्रतिकृती शेवटच्या पानावर अलगद उमटली होती.
WRGOABABD
MLIAOI
WTBIMPANETP
MLIABOAIAQC
ITTMTSAMSTGAB
सदर अक्षरांचा अर्थ काय होतो हे कुणालाही कळले नाही कदाचित हि काही सांकेतिक लिपी असावी असाच निष्कर्ष त्यातून आला.
पहिला सुगावा
सदर पुस्तकाच्या एका पानावर एक फोन नंबर सापडला जो सोमार्तन बीच च्या जवळच राहणार्या एका नर्स चा होता. पोलिसांनी तत्काळ त्या नर्स च्या घरी धाव घेतली तिच्या म्हणण्या प्रमाणे, तिच्या जवळ एक असे पुस्तक जरूर होते जे तिने द्वितीय महायुद्धाच्या वेळी दवाखान्यात भरती झालेल्या बोक्साल नामक लेफ्टनंट ला भेट दिले होते. पोलिसांनी तिला मृत व्यक्तीचा फोटो आणि पुतळा दाखवला पण तिने त्याला ओळखण्यास साफ नकार दिला. ( पण त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्यांनी हे स्पष्ट पाने नमूद केले कि पुतळा पाहून ती महील जवळ जवळ बेशुद्ध पडली होती आणि काही क्षणाच ती त्या पुतळ्याकडे बघू शकली होती, तो पुतळा पाहून तिला मानसिक धक्का बसला होता हे स्पष्ट होते.) सदर महीला आता लग्न झाली असल्याने तिने पोलिसांना आपल्या पासून दूर राहण्याची विनंती केली आणि पोलिसांनी सुद्धा ती मान्य केली पण मृत व्यक्ती बोक्साल असावी असाच निष्कर्ष त्यांनी काढला पण योग योगाने २ वर्षांनी पोलिसांना बोक्साल जिवंत सापडला तसेच त्याच्या कडे ते रुबयीयात पुस्तक सुद्धा होते आणि त्याचे शेवटचे पान सुद्धा जसेच्या तसे शाबूत होते. पुस्तकावर नर्सने स्वतःच्या हस्ताक्षरांत ४ ओळी लिहिल्या होत्या. हि गोष्ट नर्स पोलिसांना सांगण्यास आधी विसरली असावी किंवा जाणून बुजून तिने ती गुप्त ठेवली असावी.
पोलिसांनी नर्सेचे नाव सुद्धा नमूद केले नाही. अनेक वर्षांनी ज्या पोलिस अधिकार्याने त्या नर्सची चौकशी केली होते त्याने एका tv प्रोग्राम मध्ये असे सांगितले कि त्या नर्सला जरून ह्या माणसाची ओळख ठावूक होती. त्यावेळी ह्या महिलेने आपण लग्न झाल्याचे सांगितले होते तरी प्रत्यक्षांत तिने लग्न केले असल्याचा काहीही पुरावा पोलिसांना दिला नव्हता. २००७ साली काही पत्रकरांनी ह्या महिलेचा शोध घेतला पण ती त्याच साली दिवंगत झाली होति. तिच्या नातलागणी तिचे नाव प्रकाशित करण्यास न हरकत दखल दिला होता पण आज पर्यंत ते नाव प्रकाशित झाले नाही.
१९४९ साली ते मूर्त शरीर पुरण्यात आले. अचानक त्याच्या थडग्यावर कोणी तरी फुले ठेवू लागला. पोलिसांनी एक महिलेला फुले ठेवताना पहिले पण सदर महिलेने त्या मासाची आपला काहीही संबंध नाही हे स्पष्ट केले.
त्याच वेळी एक दुसरी महिला जी एका हॉटेल मध्ये कामाला होती तिने हा माणूस आदल्या रात्री आपल्या हॉटेल मध्ये राहिला होता अशी माहिती पोलिसांना दिली. तो इंग्रजी बोलणारा असून त्याच्याकडे एक काळ्या रंगाची पेटी होती आणि त्यात आपण पहिले असता आपल्याला एक सुई (डॉक्टर वापरतात तसली) प्रमाणे वस्तू दिसली होती असे सांगितले.
१९५९ साली एका भयंकर कैद्याला ह्या माणसाची ओळख ठावूक आहे असे प्रकाशित झाले पण त्यात काही तथ्य होते असे समोर आले नाही.
मृत्यू नंतर ६० वर्षे पर्यंत जगातील अनेक experts लोकांनी त्या पुस्तकावरील कोडचे उत्तर शोडण्याचा प्रयत्न केला. आर्मी, नेवी आणि संगणक तज्ञ ह्यांना त्यात यश आले नाही. केस चा तपास करण्यार्या एका अधिकार्याच्या प्रमाणे "ITTMTSAMSTGAB" ह्या चा अर्थ "It's Time To Move To South Australia Moseley Street" असा होतो असे सांगितले आणि ती नर्स सुद्धा त्याच पत्त्यावर राहत होती.
२००६ रेचल नावाच्या मुलीने tv वर मुलाखत दिली ज्यात तिने आपण त्या नर्सची मुलगी असून आपल्या आईला त्या मृत व्यक्तीची ओळख ठावून होती असे सांगितले. आपली आई कडची रशिया ची हेर असावी असा तिचा अंदाज होता. रेचल ने ह्या केस वर तपास करणाऱ्या एका प्राध्यापाकाशी शेवटी लग्न केले होते.
२०११ साली एका महिलेने आपल्या वडिलांच्या वास्तूमध्ये सापडलेले एक ओळख पत्र एका प्राध्यापकाला दिले. सदर ओळखपत्र अमेरिकेत दिले गेले होते. त्यात व्यक्तीचे नाव H. C. Reynolds असे लिहिले होते, नागरिकत्व ब्रिटीश आणि फोटो एकदम मिळता जुळता होता.
आज सुद्धा ऑस्ट्रलियन पोलीस ह्या ओळखीचा तपास करत आहेत.