Get it on Google Play
Download on the App Store

भूतांची रेल्वे स्टेशन्स


कलकत्यापासून १६१ मैलावर असणारे बेगूनकोडार खेडे. तेथे पोहचण्यास कोणताही चांगला मार्ग नाही. नाही म्हणजे रेल्वे स्टेशन आणि रुळ आहेत परंतु ४५ वर्षे तेथे ना ट्रेन आली ना प्रवासी. कारण एकच पांढरी साडी घालून येणारे एक स्त्री भूत. असे म्हणतात की एका स्त्री प्रवाशाचे ते भूत आहे. ट्रेनखाली सापडून मृत्यू पावलेल्या त्या दुर्दैवी महिलेने नंतर भूत बनून सर्वांना पिटाळून लावले. २००९ ला खूप प्रयत्न करुन ते स्टेशन चालू करण्यात आले. बघूया कधी बंद होते ते.

अॅडीसकोम्बे स्टेशनचा मालधक्का भूतांनी भरला होता असे म्हणतात. एकोणीसाव्या शकतकात बॉयलरच्या स्फोटात मरण पावलेल्या रेल्वे ड्रायव्हर्सची भूते अनेक वेळा चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पाहिलेली आहेत. एके रात्री ड्रायव्हरविना एक रेल्वे चाललेली होती याची नोंद आहे. कदाचित भूतांचेच ते काम असावे.

दुसऱ्या महायुध्दात डब्लीनच्या या स्टेशनजवळील रस्त्यावर प्रचंड बॉंम्बस्फोट झाले. नंतर सुरु झाले भूतांचे दुष्टचक्र. कोनोली स्टेशनवर नंतर सैनिकांच्या वेषात वावरणारी अनेक भूते दरवाजे बंद करणे, अचानक घंटा वाजवणे इ. भितीदायक कामे करु लागली. आश्चर्य म्हणजे या भूतांची छायाचित्रे व चित्रणही उपलब्ध आहेत.

फोनिक्स युनियन स्टेशन, अॅरीझोना हे स्टेशन सन १९५० ते १९९५ पर्यंत लगबगीचे ठिकाण होते. विमानतळाच्या विकासानंतर रेल्वे बंद पडली व इमारतीत एक कार्यालय सुरु झाले तेथूनच सुरु झाली फ्रेड या भूताची कहाणी. फ्रेडने तेथे इतकी दहशत निर्माण केली आहे की इमारतीच्या एका विशिष्ठ भागात आजही कोणी जात नाही.

व्हॅन्कोवरच्या गॅसटाऊनचे वॉटरफ्रंट स्टेशन आजही तेथे चहलपहल परंतु अधून मधून अनेक वॉचमन आणि स्वयंसेवकांना रात्रीच्या वेळी ऐतहासिक पोषाख परीधान केलेली एक राजघराण्यातील स्त्री नाच करताना दिसते. एकदा तर एका वॉचमनला स्टेशनच्या दगडी खोलीत भूत स्त्रीने बंदच करुन ठेवले होते याची नोंद आहे.

Reference: SmartDost.in