Get it on Google Play
Download on the App Store

हे SEO काय आहे?

हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे.

नमस्कार मंडळी,
आपण जर मायाजाळाचा (Internet) नेहमी वापर करत असाल,पण संगणकाचे तज्ञ नसाल. तर तुमच्या मनात SEO हा शब्द नेहमी प्रश्न निर्माण करत असेल. त्याच प्रमाणे संगणकिय अभियंते बोलतांना नेहमीच, ’ SEO ला पर्याय नाही ’, ’संकेतस्थळ लोकप्रिय करण्यासाठी SEO माहितीगारला भेटा ’. मी ही वाक्य नेहमी ऐकायचो. नंतर मी याचा शोध घेतला. त्याची जी माहिती मला मिळाली, ती मी आपल्या समोर मांडत आहे. SEO हा फ़ार मोठा विषय आहे. त्यात जितकं आत शिरलं तितकी त्याची खोली वाढते. त्यामुळे या लेखात आपण SEO ची ओळख व ठळक बाबी जाणून घेऊ.


SEO म्हणजे Search Engine Optimization. ही एक पध्दत आहे ज्याने आपल्या संकेतस्थळावर भेटी देणा-यांची संख्या आपण वाढवू शकतो. पण असे करतांना प्रक्रिया अगदी नैसर्गिक असावी म्हणजे त्यावर काही पैसा वा खास algorithm लावले गेले नसावे. यासाठी सरळ शोधयंत्र संकेतस्थळाचा (सर्च इंजिनचा) वापर व्हावा. ते कोणतेही शोधयंत्र संकेतस्थळ विक्रिकलेचा (सर्च इंजिन मारर्केटिंग) वापर न करता व्हावे.

आपणा सर्वाना माहित आहे की गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. त्यामुळे सर्वाचा ओढा या संकेतस्थळावर आपले पान यादित वर कसे येइल याकडे असतो. त्यासाठीच SEO ची मदत घेतली जाते. SEO चा वापर करुन आपण आपले संकेतस्थळाचे पान SERPs वर अधिका-अधिक वर आणू शकतो. SERPs हे Search Engine Result Pages म्हणजे शोधयंत्र संकेतस्थळावरिल शोध यादी. जेव्हाही आपण काही शोधतो तेव्हा आपल्या समोर एक यादी येते. जसे खाली पाहा. “मराठी” टाकल्यावर अशी यादी येते.यात आपल्या संकेतस्थळाचे नाव वर असण्यासाठी SEO चा उपयोग होतो.

ही एवढी खटाटोप यासाठी की जेवढे तुमचे पान यादीत वर येईल, तेवढ्या त्यावर होणा-या भेटी वाढतील. SEO चे लक्ष्य वेगवेगळे असु शकते. काही संकेतस्थळांसाठी असु शकते तर काही चित्रफ़िती, छायाचित्रे इ. साठी असु शकते.त्याचप्रमाणे शोधयादी प्रत्येक देश व भागाप्रमाणे बदलू शकते. जसे भारतात भारतीय शब्दाला अधिक महत्व असते.जी यादी google.com वर येइल ती google.co.in वर तशीच येइल असे नाही.त्यात बदल असू शकतो.

एक गंमत – कधी गुगल संकेतस्थळावर गुगल सर्च टाकुन बघा. गुगलचा कितवा नंबर येतो.

SEO हे “शब्द केन्दीत”( Keyword Centric) आहे. इथे शब्दांना खास महत्व आहे. जसे की, www.companyname.com व www.india-fruits.com यातील दुसरे नाव यादीत नेहमीच वर राहिल. असेच SEO चे अनेक बारकावे आहेत.या लेखात सर्व काही लिहिणे अशक्यच आहे.

तरी जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास येथे पाहवे – http://bit.ly/goqJ

आपल्याला हा लेख कसा वाटला हे करुर कळवावे.

(फोटो – आंतरजालावरून साभार )
हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे.

टेकमराठी दिवाळी अंक

संकलित
Chapters
संपादकीय टेक मराठी विषयी... अ अ अॅन्ड्रॉईड चा! दीपिन लिनक्सची ओळख GIT: म्हणजे नेमके काय? लिनक्स (Linux) विषयी थोडेसे मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे? तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता! डॉट नेट फ्रेमवर्क तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? एपिक browser ची ओळख मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं? हे SEO काय आहे? १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची? गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची? HTML भाग १: ओळख Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career Java पेक्षा Python का चांगली? फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं?