Get it on Google Play
Download on the App Store

दीपिन लिनक्सची ओळख

(सर्व प्रथम मी हे नमूद करू इच्छीतो की deepin linux चा उच्चार डीपिन आहे की दीपिन हे माहीत नाही. ह्या लेखामधे दीपिन असा उच्चार गृहीत धरला आहे)

दीपिन लिनक्स हे उबुन्टु लिनक्सवर आधारीत असून -चीनमधील कंपनीने deepin desktop environment (DDE) तयार केले आहे . DDE मुळे मात्र दीपिन लिनक्स फारच वेगळे झाले आहे.

उबुन्टुवर आधारीत असल्यामुळे, उबुन्टुवर उपलब्ध असलेले सर्व software दीपिनमधे आपोआपच उपलब्ध आहे,परंतू दीपिनमधे फक्त DDE हे एवढेच वेगळेपण नाही. दीपिन teamने दीपिन मूव्ही, दीपिन म्युझिक, दीपिन गेम असे पण software दीपिनमधे उपलब्ध आहे.

deepin linux 2

आपण एकेका software कडे बघुया:

DDE मधे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम मधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. उदा. Windows 8 प्रमाणे उजव्या बाजूला control panel आहे. mouse उजवी कडील खालच्या कोपऱ्यात नेला असता control center अचानक प्रकट होते – ही hot corners ची किमया. चारी कोपऱ्यामधे mouse नेला असता कोणता program सुरू व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
OS X प्रमाणे dock आहे. dock वरून नेहेमी लागणारे programs सुरू करू शकतो. ह्याशिवाय dock चा उपयोग window task bar आणि system tray सारखापण होतो.

नेहेमीच्या मेन्यू ऐवजी इथे लाँचर आहे. super key (विंडोजचा लोगो असलेली key)दाबून लाँचर चालू करता येतो. लाँचर उघडला की वेगवेगळ्या ग्रुप्स मधे वेगवेगळे programs आहेत (Internet, Games, Productivity, Utilities, System वगैरे) जर तुम्हाला कुठला program हवा आहे ते माहीत असेल,तर super key पाठोपाठ program चे नाव type करा. उदा. तुम्हाला calculatorकिंवा text editor (gedit) चालू करायचे असेल तर Utilities ग्रूप शोधायची गरज नाही – super key पाठोपाठ calc किंवा edi इतके टाईप केलेत की calculator किंवा text editor एवढेच program दाखवले जातात.

दीपिन टर्मिनल हा अजून एक मला आवडलेला program.(पण जर तुम्हाला टर्मिनल वापरायची गरज पडत नसेल तर कदाचीत तुम्हाला काही फरक पडणार नाही.)

दीपिन screenshot हा अजून एक अतिशय उपयुक्त program. लाँचर मधून किंवा Ctrl+Alt+A ह्या शॉर्टकटने चालू करता येतो – मग तुम्हाला हव्या त्या भागाचा screenshot घेता येतो . पण इतकेच नाही, त्यानंतर गरज असल्यास, त्या screenshot वर काही बाण, चौकोन वगैरे करून screenshot जास्त उपयुक्त करता येतो.

ह्या लेखात दीपिन लिनक्सची फक्त ओळख इतकेच असल्यामुळे जास्त विस्तारात जात येत नाही, परंतु जाता जाता एक नक्की सांगू इच्छीतो की ज्या लोकांनी मला दीपिन लिनक्स वापरताना super+tab वापरताना बघीतलं आहे त्या प्रत्येकाने “हे काय, windows मधे असे करता येते का?” असे हमखास विचारलेले आहे :)
super+tab वापरून मला चालू असलेल्या वेगवेगळ्या programs मधे जाता येते. windows मधे जर आपण alt+tab वापरले असेल, तर आपल्याला super+tab नक्की आवडेल.

 

deepin linux1

दीपिन लिनक्स परीपूर्ण आहे का? तर “नक्कीच नाही” असेच म्हणावे लागेल. दीपिनची २०१४ edition जरा unstable होती, त्यात देवनागरी लिपीचा चांगला support नव्हता, पण २०१४.१ मधे खूप सुधारणा केल्या आहेत. देवनागरी लिपीचा support सुध्दा ibus द्वारे आहे (हा लेख मी दीपिन २०१४.१ वापरून लिहिला आहे )
अजून एका बाबतीत सुधारणेला वाव आहे – तो म्हणजे भाषेचा अडसर. दीपिन चीनमधे विकसीत केले गेले असल्या मुळे, बहुतांशी माहिती chinese मधेच आहे. पण दीपिन विकसीत करणाऱ्या लोकांना हा प्रश्न माहीत आहे – त्यांचे कर्मचारी इंग्रजीचं प्रशिक्षण घेत आहेत.

दीपिन लिनक्सबद्दल अधिक माहिती :http://www.linuxdeepin.com/index.en.html
स्क्रीनशॉटस : http://www.linuxdeepin.com/feature2014.en.html
इंग्लीश फोरम : http://www.linuxdeepin.com/forum/8

लेखक : मंदार वझे

टेकमराठी दिवाळी अंक

संकलित
Chapters
संपादकीय टेक मराठी विषयी... अ अ अॅन्ड्रॉईड चा! दीपिन लिनक्सची ओळख GIT: म्हणजे नेमके काय? लिनक्स (Linux) विषयी थोडेसे मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे? तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता! डॉट नेट फ्रेमवर्क तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? एपिक browser ची ओळख मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं? हे SEO काय आहे? १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची? गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची? HTML भाग १: ओळख Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career Java पेक्षा Python का चांगली? फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं?