Get it on Google Play
Download on the App Store

अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2

धर्मीनुस्मृतीचे विधान येणेप्रमाणे - स्वाक्खाती भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको एहिपस्सिको ओपनयिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञूही ति ।

भगवंताचा धर्म उत्तम रीतीने प्रतिपादिलेला, ज्याच्यांत सम्यक् दर्शन आहे, जो अकाल फलद, 'या आणि पाहा' असे ज्यासंबंधाने म्हणता येईल' विचार करण्याला योग्य, सुज्ञांनी आभ्यंतरी अनुभविण्याला योग्य असा आहे.

संघानुस्मृतीचे विधान येणेप्रमाणे - सुपटिन्नो भगवतो सावकसंघो, उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, ञायपटिपन्नी भगवतो सावकसंघी, सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो, यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठ पुरिसपुग्गला, एक भगवतो सावकसंघो आहुनेय्यो पाहुनेय्यो दक्खिणेय्यो अञ्ज्लिकरणीयो अनुत्तरं पुञ्ञक्खेत्तं लोकस्सा ति ।

भगवंताचा श्रावकसंघ उत्तम मार्गाने चालणारा, सरळ मार्गाने चालणारा, न्याय्य मार्गाने चालणारा व योग्य मार्गाने चालणारा आहे.  त्याच्यात व्यक्तींच्या (सोतापन्नादिक्र) चार जोड्या आहेत, आणि एकंदरीत आठ व्यक्ति आहेत.  हा भगवंताचा श्रावकसंघ आवहनीय, पाहुणचाराला योग्य, दक्षिणेला योग्य, आणि अंजलि करण्याला योग्य आहे; हे जगाचे श्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे.

व्यक्तींच्या चार जोड्या म्हणजे स्त्रोतआपत्तिमार्गावर असलेली व स्त्रोतआपत्तिफल प्राप्‍त करून घेतलेली, या दोन व्यक्तींची एक जोडी; सकृदागामिमार्गावर असलेली व सकृदागामिफल प्राप्‍त करून घेतलेली, या दोन व्यक्तींची एक जोडी; अनागामिमार्गावर असलेली व अनागामिफल प्राप्‍त करून घेतलेली, या दोन व्यक्तींची एक जोडी; आणि अर्हन्मार्गावर असलेली व अर्हत्फल प्राप्‍त करून घेतलेली, या दोन व्यक्तींची एक जोडी.  अशा चार जोड्या व एकंदरीत आठ व्यक्ति होतात.  विशेष माहितीसाठी 'बुद्ध धर्म आणिा संघ' परिशिष्ट २ पाहा.

शीलानुस्मृतीचे विधान येणेप्रमाणे - अरियसावको अत्तनो सीलानि अनुस्सरति अखण्डानि अच्छिद्दानि असबलानि अकम्मासानि भुजिस्सानि विञ्ञुपसट्टानि अपरामट्टानि समाधिसंवत्तनिकानि ।

आर्यश्रावक आपली अखण्ड, अच्छिद्र, डाग नसलेली, कबरी न झालेली, स्वतंत्र, सुज्ञानी वण्रिलेली, अपरामृष्ट आणि समाधि उत्पन्न करणारी शीले अनुस्मरतो.

अखंड आणि अच्छिद्र यांचा अर्थ स्पष्ट आहे.  सअबल याचा अर्थ डाग नसलेली असा केला आहे.  एखाद्या तांबड्या गाईवर मध्येच मोठा पांढरा डाग असावा, किंवा पांढर्‍या गाईवर तांबडा डाग असावा, त्या गाईला सबल (शबल) म्हणतात; त्याप्रमाणे ज्या आर्य श्रावकाच्या शीलांत मध्येच एखाद्या शीलाचे पालन नीट न झाल्यामुळे खंड पडला आहे, त्याच्या शीलाला शबल म्हणतात.  ज्याची शीले मध्येमध्ये भिन्न झाली आहेत त्याच्या शीलाला कल्माष किंवा कबरी शीले म्हणतात.  भुजिष्य किंवा स्वतंत्र शीले म्हणजे ज्या शीलांच्यायोगे मनुष्य इहलोकींच्या किंवा परलोकींच्या भोगांची प्रार्थना करीत नसतो.  जी तृष्णेच्या दास्यापासून मुक्त आहेत (तण्हादासव्यतो मोचेत्वा भुजिस्सभावकरणेन भुजिस्सानि).  परामृष्ट म्हणजे अपवित्र किंवा निंद्य.  तृष्णा आणि मिथ्यादृष्टि यांच्या योगाने अपवित्र झाली नाहीत, अथवा, तुझे शील असे तसे बिघडले आहे असे कोणी म्हणून शकणार नाही, अशा प्रकारची जी शीले ती अपरामृष्ट होत.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5