गिरिमानन्दसुत्तं 3
हे आनन्द, दोषांची संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु अरण्यांत झाडाखाली किंवा एकान्त स्थळीं जाऊन असा विचार करतो कीं ह्या देहांत पुष्कळ दु:खद वेदना व पुष्कळ दोष उद्धवतात | नाना त-हेचे रोग ह्या देहांत उत्पन्न होतात | ते कोणते ? नेत्ररोग | श्रोत्ररोग | घ्राण रोग | जिव्हारोग | कायरोग | डोक्याचा रोग | कानांचा रोग | तोंडाचा रोग | दन्तरोग | कास | श्वास | पीनस (पडेसें) | दाह | ज्वर | पोटदुखी | मूर्च्छा | प्रस्कंदिका (संग्रहणी) | शूल | विषूचिका (पटकी) | कुष्ट | फोड | किलास (पांढरें कोड)| शोष (क्षय) | अपस्मार | दद्रु | खरूज | कच्छू (खाज)| नखाचा विषार | विचर्चिका (एका प्रकारचा त्वचारोग) | लोहित | पित्त | मधुमेह | प्रमेह | पिटका (पुळ्या) | भगंदरा (मूळव्याध) पित्तापासून उद्धवलेले रोग | कफापासून उत्पन्न झालेले रोग | वातापासून उत्पन्न झालेले रोग | संनिपातापासून उत्पन्न झालेले रोग | हवेच्या फेरफारानें झालेले रोग | अनियमितपणानें झालेले रोग | दुस-यानें केलेल्या प्रयोगानें उत्पन्न झालेले रोग | पूर्वसंचितानें झालेले रोग | थंडी | उन्हाळा | भूक | तहान | शौच | लाघवी || याप्रमाणें ह्या देहांत दोष पाहतो || हे आनन्द, हिला दोषांची संज्ञा म्हणतात ||
कतमा चानन्द पहानसञ्ञा | इधानन्द भिक्खु उप्पन्नं कामवितक्कं नाधिवासेति पजहति विनोदेति व्यन्तिकरोति अनमावं गमेति | उप्पन्नं व्यापादवितक्कं नाधिवासेति पजहति विनोदेति व्यन्तिकरोति अनभावं गमेति | उत्पन्नं विहिंसा वितक्कं नाधिवासेति पजहति विनोदेति व्यन्तिकरोति अनभावं गमेति | उप्पन्नुप्पन्ने पापके अकुसले धम्मे नाधिवासेति पजहति विनोदेति व्यन्तिकरोति अनभावं गमेति | अयं वुच्चतानन्द पहानसञ्ञा ||
हे आनन्द, प्रहाणाची संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु उद्धवलेला विषयवितर्क मनांत राहूं देत नाहीं, त्याचा त्याग करितो, त्याचें विनोदन करितो, त्याचा अंश राहूं देत नाहीं, त्याला अभावाप्रत नेतो | उद्धवलेला द्वेषवितर्क मनात राहूं देत नाहीं, त्याचा त्याग करितो, , त्याचें विनोदन करितो, त्याचा अंश राहूं देत नाही, त्याला अभावाप्रत नेतो | उद्धवलेला दुस-यास तसदी देण्याचा वितर्क मनांत राहूं देत नाहीं, उद्धवलेलें पापकारक अकुशल मनोधर्म मनांत राहूं देत नाहीं, त्याचा त्याग करितो, त्यांचे विनोदन करितो, त्याचा अंश राहूं देत नाहीं, त्याला अभावाप्रत नेतो || हे आनन्द, हिला प्रहाणाची संज्ञा म्हणतात ||
कतमा चानन्द विरगसञ्ञा | इधानन्द भिक्खु अरञ्ञगतो वा रुक्खमलगतो वा सुञ्ञागारगतो वा इति पटिसं चिक्खति | एतं सन्तं एतं पणीतं | यदिदं सब्बसंखारसमथो सब्बुपधिपटिनिस्सग्गो तण्हक्खयो विरागो निब्बानं ति || अय़ं वुच्चतानन्द विरागसञ्ञा ||
हे आनन्द, विरागाची संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु अरण्यांत झाडाखाली किंवा एकान्तस्थळी जाऊन असा विचार करितो कीं, सर्व संस्कारांचा उपशम करणें, सर्व उपाधींचा त्याग करणें, तृष्णेचा क्षय करणें, विराग, निर्वाण हें चांगलें, हें उत्तम || हे आनन्द, हिला विरागाची संज्ञा म्हणतात ||