Get it on Google Play
Download on the App Store

मंगलसुत्तं 1

मंगलसुत्तं

एवं मे सुतं| एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे|| अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिक्कन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमि| उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि| एकमन्तं ठिता खो सा देवता भगवन्तं गाथाय अज्झभासि-

असें मीं ऐकलें आहे | एके समयीं भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता || तेव्हां रात्र संपत आली असतां एक अत्यंत सुंदर देवता सर्व जेतवन प्रकाशित करून भगवान् होता तेथें आली | तेथें येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस उभी राहिली | एका बाजूस उभी राहून ती देवता भगवन्ताला पद्यांत म्हणाली -

बहू देवा मनुस्सा च मंगलानि अचिंतयुं|
आकंखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं ||१||

अनेक देवांनी आणि मनुष्यांनी आपणास सुख व्हावें या हेतूनें मंगलांची कल्पना केली | त्यांत उत्तम मंगल कोणतें ते सांग ||१||

असेवना च बालानं पण्डितानं च सेवना |
पूजा च पूजनीयनं एतं मंगलमुत्तमं ||२||


(भगवान म्हणाला) मूर्खांच्या संगतीपासून दूर राहणें, पंण्डितांची संगति धरणें आणि पूज्य जानांची पूजा करणे, हें उत्तम मंगल होय ||२||

पतिरूपदेसवासो च पुब्बे च कतपुञ्ञता |
अत्तसम्मापणिधि च एतं मंगलमुत्तमं ||३||

योग्य देशांत वसति करणें, पदरीं पुण्याचा सांठा असणें आणि सन्मांर्गात मन दृढ करणें,
हें उत्तम मंगल होय ||३||